महाराष्ट्रानंतर आता वाराणसीतही अजानच्या वेळी हनुमान चालीसा, लावले गेले लाउडस्पीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:31 AM2022-04-14T11:31:32+5:302022-04-14T11:32:08+5:30
सुधीर सिंह म्हणाले, प्रत्येक अजानच्या वेळी याच पद्धतीने लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा पठण केले जाईल. याच बरोबर आपला हेतू हिंदू-मुस्लीम सौहार्द खराब करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील लाउडस्पीकरवरील हनुमान चालीसा पाठणाचे लोन, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही पोहोचले आहे. येथे 'श्री काशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलना'कडून घराच्या छतावर लाउडस्पीकर लावण्यात आले असून, त्यावरून अजानच्यावेळी मोठ्या आवाजात हनुमान चालीसा पठण केले जात आहे.
श्री काशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी वाराणसीच्या साकेत नगर भातात अपल्या घरापासूनच याची सुरुवात केली आहे. ते म्हणाले, प्रत्येक अजानच्या वेळी याच पद्धतीने लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा पठण केले जाईल. याच बरोबर आपला हेतू हिंदू-मुस्लीम सौहार्द खराब करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुधीर सिंह म्हणाले, काशीतील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच वैदिक पठण हेत होते. पूजा-पाठ आणि हनुमान चालीसा पठणही व्हायचे, पण दबावामुळे या सर्व गोष्टी बंद झाल्या. एवढेच नाही, तर यासाठी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला देण्यात आला होता. यानंतर आम्ही आमच्या मंदिरांवरून लाउडस्पीकर हटवले. मात्र, मशिदींवर लाउडस्पीकर तसेच लागलेले राहिले. सकाळी 4:30 वाजल्यापासूनच अजानचा आवाज येऊ लागतो.
सिंह पुढे म्हणाले, जेव्हा अजानचा आवाज येईल, तेव्हा मंदिरांतून लाऊडस्पीकरवर वैदिक मंत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करायचे, असे आम्ही ठरवले आहे. यामुळे अजान सुरू होताच आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली आहे. तसेच, यापूर्वीही आम्ही अजानच्या आवाजासंदर्भात आक्षेप नोंदवला होता आणि त्रास होऊ नये, यासाठी आवाज कमी ठेवावा, असे म्हटले होते. याच बरोबर, सध्या चार ते पाच वेळा हनुमान चालीसा पाठण केले जात आहे. मात्र, नियमानुसार, सूर्योदय आणि सूर्यास्तावेळीच हनुमान चालीसा पाठ करायला हवे. यामुळे भविष्यात दोन वेळाच हनुमान चालीसा पठण केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.