राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:15 PM2024-01-01T13:15:52+5:302024-01-01T13:17:33+5:30

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक ‘महाविरी’ ध्वज बनवण्यात  निष्णात आहेत.

Hanuman flag will be on the peak of Ram temple! Prepared by Ghulam Bhai, a famous craftsman of Jharkhand | राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार

राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार

हजारीबाग : झारखंडमधील कारागीर गुलाम जिलानी (५५) यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी ४० फूट लांब आणि ४२ फूट रुंद ‘हनुमान ध्वज’ तयार केला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर हा ध्वज फडकावला जाईल.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक ‘महाविरी’ ध्वज बनवण्यात  निष्णात आहेत. जिलानी  म्हणाले की, १०० कोटी लोकांचे स्वप्न असलेल्या ऐतिहासिक राम मंदिरावर मी शिवलेला ध्वज बसविला जाईल, याचा अभिमान आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढेल. मला संधी मिळाली तर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी नक्कीच अयोध्येला जाईन. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा किंवा रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जिलानी म्हणाले की मी माझ्या वडिलांसोबत फतेह लाल अग्रवाल यांच्या मालकीच्या भोला टेक्सटाईलमध्ये काम करायचो. सध्या ते वीर वस्त्रालयात काम करतात.

१० दिवस ध्वज तयार करण्यासाठी लागले. सध्या ध्वज तयार आहे.
१५० मीटर कपड्याचा वापर ध्वज तयार करण्यासाठी करण्यात आला.
१०० फूट उंचीच्या खांबावर या ध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे.
२१ हजार रुपये या ध्वजाची किमत.

ऐक्य मजबूत करण्याचे काम
- वीर वस्त्रालयाचे मालक देवेंद्र जैन म्हणाले, “४० फूट उंच ध्वजाच्या एका बाजूला भगवान हनुमानाची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान राम आणि लक्ष्मण यांची प्रतिमा आहे. 
- जिलानी यांनी हजारो रामनवमी आणि महाविरी ध्वज बनविले आहेत जे या प्रदेशात हिंदू-मुस्लिम ऐक्य मजबूत करतात. हा ध्वज बनवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) बडा बाजार हजारीबाग येथील प्रमुख नेते नवल किशोर खंडेलवाल यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 
- खंडेलवाल (८१) हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

विदेशातूनही झेंडे बनविण्याचे काम
वीर वस्त्रालयाद्वारे दरवर्षी सर्व धर्मांसाठी दोन लाखांहून अधिक ध्वज बनवले जातात. रामनवमी आणि शिवरात्रीला परदेशातून झेंडे बनवण्याचे कामही मिळत असल्याचे जैन यांनी सांगितले. खंडेलवाल यांनी म्हटले की, बाबरी मशीद विध्वंसानंतर अटक करून तीन महिने कारागृहात ठेवण्यात आले होते. अयोध्येत राम मंदिर पाहण्याचे माझे स्वप्न ३२ वर्षांनी पूर्ण होत आहे. सध्या तब्येत ठीक नाही, पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात येण्यासाठी प्रयत्न करेन.
 

Web Title: Hanuman flag will be on the peak of Ram temple! Prepared by Ghulam Bhai, a famous craftsman of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.