बेलखेड येथे हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड पोलीस घटनास्थळी दाखल: श्वानपथकाला केले पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2015 02:21 AM2015-06-19T02:21:26+5:302015-06-19T02:21:26+5:30
बेलखेड : येथील मोठ्या मारुती मंदिरात १८ जूनच्या रात्री एका इसमाने घुसून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे तेथे तातडीने पोहोचलेल्या हिवरखेड पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मंदिराचे गेट बंद केले होते.
Next
ब लखेड : येथील मोठ्या मारुती मंदिरात १८ जूनच्या रात्री एका इसमाने घुसून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे तेथे तातडीने पोहोचलेल्या हिवरखेड पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मंदिराचे गेट बंद केले होते.बेलखेड गावात हनुमानाची दोन मंदिरे असून, त्यापैकी मोठा मारुती नावाने ओळखल्या जाणार्या मंदिरात हनुमानाची सहा फूट उंचीची मूर्ती आहे. सदर मंदिरात गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घुसलेल्या एका माथेफिरू वृत्तीच्या इसमाने सदर मूर्तीची टिकास मारून तोडफोड केली. या घटनेची माहिती तेथील पुजार्याने गावाचे पोलीस पाटील संतोष खुमकर व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष गोपाल मलीये यांना सांगितली. सदर वृत्त आगीसारखे गावात पसरून मंदिरासमोर प्रचंड जमाव जमला होता. पोलीस पाटील व तंटामुक्त ग्रामसमितीचेे अध्यक्षांनी याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती दिली. हिवखेड पो.स्टे.चे ठाणेदार भास्कर तवर व पोलीस कर्मचारी त्वरेने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मंदिराचे गेटला कुलूप लावून बंद केले व अकोल्याहून श्वानपथकास पाचारण केले. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार तवर यांच्या मार्गदर्शनात हिवरखेड पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)०००००००००००००००