आनंद आहे, म्हैसूरचा राजा हे करण्यास तयार आहे; तिकीट कापताच प्रताप सिंहांचे सूर बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:57 AM2024-03-15T09:57:20+5:302024-03-15T09:57:50+5:30

म्हैसुरचे महाराजा आता कचरा साफ करणार आहेत. लोकांचे प्रश्न सो़डविणार आहेत. नेत्यांसाठी राजशिष्टाचार पाळणार आहेत, असे प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.

Happily, the king of Mysore is willing to do this; As soon as the ticket was cut, BJP MP Pratap Singh's tone changed | आनंद आहे, म्हैसूरचा राजा हे करण्यास तयार आहे; तिकीट कापताच प्रताप सिंहांचे सूर बदलले

आनंद आहे, म्हैसूरचा राजा हे करण्यास तयार आहे; तिकीट कापताच प्रताप सिंहांचे सूर बदलले

आपले तिकीट कापून म्हैसूरच्या राजाला तिकीट दिल्याने भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांचा तिळपापड झाला आहे. प्रताप सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच म्हैसुरचे महाराजा यदुवीर वडियार यांची स्तुती केली होती. आता लोकांच्या प्रश्नांसाठी म्हैसुरचा राजमहाल उघडला जाणार असेल तर मी खूश आहे, असे म्हणत टोले हाणले आहेत. 

म्हैसुरचे महाराजा आता कचरा साफ करणार आहेत. लोकांचे प्रश्न सो़डविणार आहेत. नेत्यांसाठी राजशिष्टाचार पाळणार आहेत, असे प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. आमच्याकडे पक्षाचे प्रोटोकॉल आहेत. आमचे वरिष्ठ आजूबाजूला असतात तेव्हा आम्ही जमिनीवर बसतो. आम्ही आमच्या नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी उन्हात थांबतो. आम्ही आनंदी आहोत, महाराज हे करायला तयार आहेत, असा खोचक टोला खासदारांनी लगावला आहे. 

एवढेच नाही तर आम्ही आमच्या नेत्यांना विमानतळावर घेण्यासाठी जातो. कार्यक्रमांना घेऊन जातो आणि विमानतळावर परत सोडतो. हे सर्व करून महाराजांना आनंद होत असेल तर आपणही आनंदी आहोत, असे ते म्हणाले. 

आता महाराज सामान्य लोकांना राजवाड्यात येऊ देतील. आम्हाला आणखी काय हवे आहे? म्हैसूर-कोडागूचे लोक मला छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी फोन करायचे. कल्पना करा की आता महाराज यासाठी तयार आहेत. मी खूप आनंदी आहे. कचरा आणि भंगार साफ करण्यासाठी लोक मला मदतीसाठी बोलावत होते, पण मला आनंद आहे की महाराज आता ते करतील, असेही प्रताप सिंह म्हणाले. 
 

Web Title: Happily, the king of Mysore is willing to do this; As soon as the ticket was cut, BJP MP Pratap Singh's tone changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.