Happy Birthday NAMO, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाच्या लोकार्पणासह फुंकणार गुजरात निवडणूक प्रचाराचे बिगुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 08:21 AM2017-09-17T08:21:29+5:302017-09-17T08:26:58+5:30

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजेच आज करणार आहेत.

Happy Birthday NAMO, Prime Minister Narendra Modi will blow the blistering Gujarat elections | Happy Birthday NAMO, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाच्या लोकार्पणासह फुंकणार गुजरात निवडणूक प्रचाराचे बिगुल

Happy Birthday NAMO, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाच्या लोकार्पणासह फुंकणार गुजरात निवडणूक प्रचाराचे बिगुल

googlenewsNext

अहमदाबाद , दि.17- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजेच आज करणार आहेत. याबरोबरच आज ते गुजरात निवडणुकी प्रचाराचे बिगुलही फुंकणार आहे. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, ममता बॅनर्जी, अमित शाह, नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 67 वा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून भाजपाकडून  हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. लोकार्पणानंतर पंतप्रधान डभोई येथे सभा घेणार आहेत. आज होणारा धरण लोकापर्ण सोहळा अहमदाबादपासून 200 किलोमीटवर आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 1961 मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला.
नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या सुचनेनुसार धरणाचे १७ जून रोजी बंद केलेले ३० दरवाजेही पंतप्रधान उघडतील. दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले,' यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल'.
या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे. 
या प्रकल्पाची पायाभरणी १९६१ साली झाली होती. अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली धरणाचे काम थांबवण्याचे आदेश १९९६ साली देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले. भारतातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने उद्यापासून काम करण्यास सुरुवात करणार आहे. सर्व काम पूर्ण होण्यास ५६ वर्षे लागण्याते हे विरळ उदाहरण असावे.

Web Title: Happy Birthday NAMO, Prime Minister Narendra Modi will blow the blistering Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.