Happy Birthday Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा 68 वा वाढदिवस; वाराणसीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:03 AM2018-09-17T08:03:42+5:302018-09-17T08:55:12+5:30
Happy Birthday PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस ते वाराणसीमध्ये साजरा करणार आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. मोदी त्यांचा वाढदिवस त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये साजरा करणार आहेत. यानिमित्ताने वाराणसीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतील. त्यानंतर ते शाळकरी मुलांसोबत 'चलो जिते है' हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे. मागील वाढदिवसाला मोदींनी गांधीनगरला जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी सरदार सरोवराचं लोकार्पण केलं होतं.
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही मोदी अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचं विस्तारीकरण, रिंग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. मोदी यांच्या वाराणसी भेटीच्या पार्श्वभूमीवर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतील कार्यक्रम
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता रोहनियाच्या नरउर गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
- संध्याकाळी 7 वाजता डीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसमध्ये काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
- 18 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता वारासणीत जवळपास 557 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसंच भूमिपुजन करणार आहेत.
Warm greetings to Shri @narendramodi on his birthday. Under his leadership India has grown tremendously and became the 6th largest economy of the world. He is a man of vision and action who is working assiduously to fulfil the dream of New India. I wish him good health &long life
— राजनाथ सिंह (@rajnathsingh) September 17, 2018
Birthday greetings to the respected @narendramodi Ji.A man who is working tirelessly for the better prospect and development of India. Under his leadership, the image of India has been uplifted in the world.A true mass leader who is loved by all.#HappyBdayPMModipic.twitter.com/bfqNWd17JB
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) September 17, 2018
Special Birthday Wishes From Little Fan Of PM Modi Ji....
— Narendra Modi (@narendramodi177) September 17, 2018
Retweet & Watch #HappyBdayPMModi#HappyBirthdayPMpic.twitter.com/9fT2qMxr1h
Wishing our beloved Prime Minister Shri Narendra Modi a very Happy Birthday. May God give him good health and strength to fulfill his vision of transforming India into a progressive and a developed nation.#HappyBdayPMModipic.twitter.com/QZRadu0Tp1
— B.S. Yeddyurappa (@BSYBJP) September 17, 2018
Wishing our honourable Prime Minister @narendramodi a very happy birthday! #HappyBdayPMModi
— Manushi Chhillar (@ManushiChhillar) September 16, 2018
During my homecoming after winning Miss World, I don’t remember being quiet for even a single minute. His patience is admirable as he listened to my stories from college and Miss World. pic.twitter.com/voPtByWBpA
A prayer to god to grant our beloved PM @narendramodi a long and a healthy life .
— Paresh Rawal (@SirPareshRawal) September 17, 2018
Warm birthday compliments to the dynamic & illustrious Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. I wish him good health and a long life. May he continue to render for many more years his exceptional services to the nation and guide the country to its glory. @narendramodi
— Arun Jaitley (@arunjaitley) September 17, 2018