पंतप्रधान मोदींनी "इंडिया"ला दिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा
By admin | Published: April 24, 2017 06:11 AM2017-04-24T06:11:18+5:302017-04-24T06:26:10+5:30
जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक जॉन्टी ऱ्होड्स याच्या मुलीच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक जॉन्टी ऱ्होड्स याच्या मुलीच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सची मुलगी काल (दि.23) दोन वर्षांची झाली. 2015 मध्ये जॉन्टी आयपीएलसाठी भारत दौ-यावर असताना त्याला मुलगी झाली होती, त्यामुळे त्याने मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं होतं.
जॉन्टीने आपल्या मुलीसह एक फोटो ट्विट केला आणि "हॅप्पी बर्थडे बेबी इंडिया" अशी पोस्ट केली. त्यावर पंतप्रधान मोदींनी जॉन्टीच्या मुलीला शुभेच्छा दिल्या. "इंडिया"ला "इंडिया"कडून शुभेच्छा असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं.
गेल्या वर्षी मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जॉन्टीने कुटुंबियांसमवेत तामिळनाडूमधील एका मंदिराला भेट दिली होती. "भारताची श्रीमंत संस्कृती आणि भौगोलिक विविधतेने आपण भारावून गेलो आहोत त्यामुळेच मुलीचं नाव इंडिया ठेवलं होतं", असं जॉन्टीने सांगितलं होतं. "मी येथे खूप वेळ घालवला आहे. भारतामध्ये संस्कतींच असलेलं मिश्रण, ऐतिहासिक वारस आणि परंपरा या गोष्टी मला खूप आवडतात. भारत अध्यात्मिक देश आहे. मला हे एकीकरण खूप आवडतं. जीवनात समतोल राखणं महत्वाचं असतं", असं जॉन्टीने गेल्यावेळी सांगितलं होतं.
Happy birthday to India, from India. :) https://t.co/DbOZFEKLe9
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2017