देशभरात बकरी ईदचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 09:41 AM2017-09-02T09:41:07+5:302017-09-02T09:56:54+5:30
आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिमांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत
नवी दिल्ली, दि. 2 - आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिमांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईदच्या शुभेच्छा, आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसंवादाची भावना वाढत राहो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
Best wishes on Id-ul-Zuha. May the spirit of harmony, brotherhood and togetherness be furthered in our society.
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2017
ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे.
Madhya Pradesh: Prayers offered at Bhopal's Idgah on the occasion of #EidAlAdhapic.twitter.com/8rs9VJPgJY
— ANI (@ANI) September 2, 2017
J&K: Prayers being offered at Srinagar's Radpora on the occasion of #EidAlAdhapic.twitter.com/aHCC0bqLXo
— ANI (@ANI) September 2, 2017
People gather at Delhi's Jama Masjid for #EidAlAdha prayers pic.twitter.com/AOEjzAHtgI
— ANI (@ANI) September 2, 2017
बकरी ईदला जनावरं कापण्याऐवजी केक कापा, RSS प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचचं आवाहन
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. मुस्लिम उलेमा मात्र मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या भूमिकेविरोधात उभी ठाकली आहे. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदच्या दिवशी जनावरांचा बळी देण्याला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.
जनावरांचा बळी देण्याऐवजी बक-याच्या आकाराचा केक कापा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम नागरिकांना करत आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले की, बळी देणं इस्लाममध्ये गरजेचं नाही. पशू-पक्षी, झाडेझुडपे सर्व काही अल्लाहच्या दयेनं आहेत. बक-याच्या आकाराचा केक कापूनही बकरी ईद साजरी केली जाऊ शकते. तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणालेत की, ' बळी देण्याबाबत कुरानमध्ये सांगण्यात आले आहे. जनावरांचा बळी मंदिरामध्येही दिला जातो. त्यामुळे हा सल्ला केवळ मुस्लिमांनाच का दिला जात आहे?', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘ते’ पोलीसही रडारवर! बकरी ईदसाठी विशेष दक्षता, व्यापा-यांना त्रास देणा-यांचे होणार तत्काळ निलंबन
मुंबई, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत. व्यापा-यांना दमदाटी करून पैसे उकळणा-याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांना, तत्काळ निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, गोमांसाबाबत स्वत: व्यापा-यांवर कारवाई न करता, त्याबाबत पहिल्यांदा पोलिसांना माहिती द्यावयाची आहे. त्यांनी कायदा हातात घेतल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.