आनंदी देशांमध्ये भारत ११८ व्या स्थानी, पाकिस्तान, बांगलादेश भारताच्या पुढे
By admin | Published: March 17, 2016 02:09 PM2016-03-17T14:09:12+5:302016-03-17T14:09:12+5:30
संयुक्त राष्ट्राने आनंदी देशांची जागतिक यादी जाहीर केली आहे. या यादीत १५६ देशांमध्ये भारत ११८ व्या स्थानी आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - संयुक्त राष्ट्राने आनंदी देशांची जागतिक यादी जाहीर केली आहे. या यादीत १५६ देशांमध्ये भारत ११८ व्या स्थानी आहे. दहशतवादाने ग्रासलेले पाकिस्तान, सोमालिया हे देश आनंदी असण्यामध्ये भारताच्या पुढे आहेत.
सोमालिया ७६, चीन ८३, पाकिस्तान ९२ आणि बांगलादेश ११० व्या स्थानी आहे. स्वित्झर्लंडवर मात करुन डेन्मार्कने या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
जीडीपी आणि अन्य निकषांव्दारे हे सर्वेक्षण करण्यात आले. पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा आर्थिक स्तर चांगला असूनही भारताला आनंदी रहाण्यामध्ये या देशांच्या पुढे जाता आलेले नाही.