ममता बॅनर्जींकडून ईदच्या शुभेच्छा, नेटीझन्स म्हणाले 'जय श्रीराम' दीदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:35 PM2019-06-05T15:35:42+5:302019-06-05T15:40:07+5:30
'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान, असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू
कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशवासीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर असलेल्या ममता यांच्या शुभेच्छांना 'जय श्री राम' असे म्हणत नेटीझन्सने प्रत्युत्तर दिले आहे. ममता यांनी कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला.
'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान, असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू. जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा आणि हा आमचा नारा आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता यांनी 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है' हा शेर देखील यावेळी सादर केला. तसेच, ममता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही देशवासियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, ट्विटवर अनेकांनी ममता यांच्या शुभेच्छांना जय श्री राम म्हणत प्रत्युत्तर दिले. ममता यांच्या शुभेच्छांना ट्विटरवर ट्रोल करण्यात आले आहे. आपण विविधतेच एकता कायम ठेऊ, धर्म प्रत्येकाचा आपला असतो, तर उत्सव सर्वांचा असतो, असे बंगाली भाषेतील ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले होते. ममता यांच्या या ट्विटला ट्विटर युजर्संने हिंदी आणि इंग्रजी भाषेत जय श्रीराम असे उत्तर दिले आहे.
সকলকে জানাই খুশীর ঈদের শুভেচ্ছা ও অভিনন্দন। ধর্ম যার যার, উৎসব সবার। আসুন, বৈচিত্রের মধ্যে ঐক্যের এই ধারাকে বজায় রাখি। একতাই সম্প্রীতি - এটাই হোক আমাদের মন্ত্র। #EidMubarakpic.twitter.com/4F56ex3bGP
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 4, 2019