पंतप्रधान मोदींवर जगभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:05 AM2019-05-26T04:05:01+5:302019-05-26T04:05:16+5:30

अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारशी विविध क्षेत्रांत सहकार्यासह मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Happy wishes to PM Modi from all over the world | पंतप्रधान मोदींवर जगभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर जगभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

googlenewsNext

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार विजयाबद्दल जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन होत असून चीनसह शेजारील राष्ट्रासह महाशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारशी विविध क्षेत्रांत सहकार्यासह मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत.
नेपाळ, चीन, भूतान, म्यान्मा, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि मालदीव या शेजारी देशांनी विभागीय शांतता, विकास आणि समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखविली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा स्थापन होणाºया सरकारमुळे भारत-पाकिस्तानदरम्यान संबंधाची दिशा निश्चित होणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून विभागीय शांतता, विकास आणि समृद्धीसाठी मोदींसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. नेपाळ आणि भारतादरम्यान भावबंध सर्वश्रुत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत परस्परांदरम्यान संबंध दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना आणि पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
>मोदी-इम्रान यांच्यात चर्चा?
पंतप्रधान पदावर पुन्हा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपला पहिला विदेश दौरा जूनच्या मध्यात किर्गिस्तानचा करू शकतील. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कॉर्पोरेशन आर्गनायझेशनची (एससीओ) बैठक होणार आहे. बैठकीस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हजर राहण्याची अपेक्षा आहे. येथे उभय नेत्यांत चर्चा होऊ शकते.
>जूनमध्ये ट्रम्प-मोदी भेट...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोनवरून अभिनंदन केले. या वेळी दोन्ही नेत्यांनी २८, २९ जून रोजी जपानमध्ये (ओसाका) होणाºया जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भेटण्याचे मान्य केले.
>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी आणि भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोदी यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात भारतातील शासनप्रणाली सुधारली, अशा शब्दांत चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाने प्रशंसा केली.

Web Title: Happy wishes to PM Modi from all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.