14 तरुणांच्या टोळक्याकडून दोन तरुणींची छेडछाड, व्हिडीओ काढून टाकला ऑनलाइन

By Admin | Published: May 29, 2017 02:18 PM2017-05-29T14:18:10+5:302017-05-29T14:18:10+5:30

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात 14 तरुणांनी दोन तरुणींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

The harassment of two young men by the gang of 14 youths, and the video removed | 14 तरुणांच्या टोळक्याकडून दोन तरुणींची छेडछाड, व्हिडीओ काढून टाकला ऑनलाइन

14 तरुणांच्या टोळक्याकडून दोन तरुणींची छेडछाड, व्हिडीओ काढून टाकला ऑनलाइन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
रामपूर, दि. 29 - उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात 14 तरुणांनी दोन तरुणींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर या तरुणांनी मुलींची छेड काढतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल फोनवर शूट करत सोशल मीडियावरही अपलोड करुन टाकला. लखनऊपासून 318 किमी अंतरावर असणा-या रामपूर जिल्ह्यात ही लाजिरवाणी घटना घडली आहे. तांडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या गावात हा सगळा प्रकार घडला आहे. 
 
हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र रविवार रात्रीपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी 14 तरुणांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे. 
 
पीडित तरुणींची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडीओमध्ये हे तरुण रस्त्यावरुन जाणा-या या तरुणींचा रस्ता अडवताना दिसत आहेत. आरोपींच्या दुचाकी व्हिडीओत दिसत आहेत. या तरुणींना धक्काबुक्की करत पाठलाग केला जात आहे. इतकंच नाही तर त्यांच्या अंगाला स्पर्श करत कपडेही खेचत आहेत. या तरुणी मदतीची याचना करत ओरडत आहेत. मात्र याचा तरुणांवर काहीच फरक पडताना दिसत नाही. तरुणी जाण्याचा प्रयत्न करता आरोपी त्यांचा पाठलाग करत वारंवार रोखत होते. 
 
"व्हिडीओतील तरुणांची ओळख पटली आहे. मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु असून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतरांनाही अटक केली जाईल. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही एफआयर दाखल केला", अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विपिन ताडा यांनी दिली आहे. 
 

Web Title: The harassment of two young men by the gang of 14 youths, and the video removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.