पोलिसांना फोन करुन PM मोदींना मारण्याची धमकी, हरभजनला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 03:56 PM2020-08-11T15:56:45+5:302020-08-11T16:00:05+5:30

नोएडा पोलिसांनी सोमवारी या 33 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हरभजन सिंग असे या युवकाची ओळख पटली असून त्याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार असल्याची धमकी फोनवरुन दिली होती.

Harbhajan Singh arrested for threatening to kill Modi in noida | पोलिसांना फोन करुन PM मोदींना मारण्याची धमकी, हरभजनला अटक

पोलिसांना फोन करुन PM मोदींना मारण्याची धमकी, हरभजनला अटक

Next
ठळक मुद्देनोएडा पोलिसांनी सोमवारी या 33 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हरभजन सिंग असे या युवकाची ओळख पटली असून त्याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार असल्याची धमकी फोनवरुन दिली होती.

नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे अनेकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच, कित्येकांना आपल्या नोकरीवरुनही काढण्यात आलंय. हरयाणातील अशाच एका युवकाने नोकरी गेल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केलाय. नोएडा येथे राहणाऱ्या या तरुणाने लखनौ कंट्रोल रुमला फोन करुन धमकी दिली होती. त्यामुळे शासन व प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 

नोएडा पोलिसांनी सोमवारी या 33 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हरभजन सिंग असे या युवकाची ओळख पटली असून त्याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधाननरेंद्र मोदींना मारणार असल्याची धमकी फोनवरुन दिली होती. मूळचा हरयाणाचा असलेला हा तरुण सध्या नोएडातील सेक्टर 66 मध्ये राहत आहे. ज्यावेळी या युवकाला पोलिसांनी पकडले, तेव्हाही हा नशेत होता. तर, हा युवक ड्रग्ज अॅडिक्टेड असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

याप्रकरणी अतिरिक्त पोलीस उपायुक्त अंकुर अग्रवाल यांनी माहिती देताना म्हटले की, हरभजन याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधाननरेंद्र मोदींना इजा पोहोचवणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर, स्थानिक विभागातील फेज ३ च्या पोलिसांनी तत्काळ घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी या युवकाला ट्रेस करुन मामुरा परिसरातून अटक केली. हा आरोपी ड्रग्ज अॅडीक्टेट असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. 
 

Web Title: Harbhajan Singh arrested for threatening to kill Modi in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.