शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी
By बाळकृष्ण परब | Published: October 9, 2020 08:52 PM2020-10-09T20:52:54+5:302020-10-09T20:57:03+5:30
West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सुरक्षेत तैनात असलेल्या एका शीख जवानाला मारहाण करत त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याने क्रिकेटपटू हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये एका शीख सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेत तैनात असलेले शीख जवान बलविंदर सिंग यांची पगडी खेचण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोलकाता पोलीस या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत. यादम्यान, सरद जवानाची पगडी सुटत असल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणाती दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र या व्हिडीओबाबत पश्चिम बंगाल पोलिसांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Plz have a look into this matter @MamataOfficial this isn’t done 😡😡 https://t.co/mKrbQhn1qy
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 9, 2020
दिल्लीतील भाजपा नेते इंप्रित सिंग बख्शी यांनी ट्विट करून सांगितले की, प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या बलविंदर सिंग यांची पगडी खेचून उतरवणे आणि रस्त्यावर फरफटत नेऊन मारणे या गोष्टी पश्चिम बंगाल पोलिसांचे क्रौर्य दाखवणाऱ्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत कारवाई केली पाहिजे. याच पगडीवाल्यांनी बांगलादेशची निर्मिती केली होती.
प्रियांगू पांडेय की सेक्युरिटी में तैनात बलविंदर सिंह की पगड़ी खीच खीच कर उतारना,सड़क पर घसीट कर बर्बर तरीके से पीटा जाना बंगाल पुलिस की बर्बरता दर्शाता है।@MamataOfficial दोषी पुलिसवालों पर सख्त कार्यवाही करो।
— Impreet Singh Bakshi ਇਮਪ੍ਰੀਤ ਸਿੰਘ ਬਖ਼ਸ਼ੀ (@impreetsbakshi) October 9, 2020
इसी पगड़ी वाले सिखो ने बांग्लादेश बनाया था। pic.twitter.com/stWTeXKmpC