ब्लडी इंडियन म्हणणा-या वैमानिकाशी भिडला हरभजन

By admin | Published: April 26, 2017 04:46 PM2017-04-26T16:46:36+5:302017-04-26T19:23:59+5:30

मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानं एका जेट एअरवेजच्या वैमानिकाला चांगलाच धडा शिकवला आहे.

Harbhajan Singh, who is from a pilot named Bloody Indian | ब्लडी इंडियन म्हणणा-या वैमानिकाशी भिडला हरभजन

ब्लडी इंडियन म्हणणा-या वैमानिकाशी भिडला हरभजन

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 24 - मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानं एका जेट एअरवेजच्या वैमानिकाला चांगलाच धडा शिकवला आहे. हरभजन विमानानं प्रवास करत असतानाच एक पायलट विमानातील काही प्रवाशांशी असभ्यरीत्या वर्तन करत होता. त्या वैमानिकानं एका महिला प्रवाशाला मारहाण केली, तसेच दुस-या एका विकलांग व्यक्तीलाही धक्काबुक्की केली. हरभजन सिंगनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं हरभजनवरही वर्णद्वेषी टीका केली. त्या वैमानिकानं "यू ब्लडी इंडियन," असं हरभजनसह इतर सहप्रवाशांना हिणवत विमानातून चालते होण्यास सांगितलं. त्यानंतर हरभजनलाही संताप अनावर झाला आणि त्यानंही त्याला खडे बोल सुनावले.

हरभजन सिंगनं त्या वैमानिकाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केली असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर हरभजन सिंगनं ट्विट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तो म्हणाला, जेट एअरवेजच्या बर्न्ड होसलीन हा वैमानिक माझ्या भारतीयांना विमानातून बाहेर जायला सांगत होता. मात्र तो इथूनच कमाई करतोय.

दरम्यान, हरभजननं जेट एअरवेजच्या त्या वैमानिकाविरोधात तीन ट्विट केले आहेत. त्या तो म्हणाला, वैमानिकानं फक्त वर्णद्वेषी टिपण्णी केली नाही, तर महिलेला मारहाण करत दुर्व्यवहारही करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका विकलांग व्यक्तीला धक्काबुक्कीही केली. हे असभ्य वर्तन करणा-या जेट एअरवेजची मला लाज वाटते. त्याने ट्विट करत असे गैरप्रकार भारतात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही जेट एअरवेजला दिला आहे. मारहाण करणारा वैमानिक हा विदेशी असून, तो जेट एअरवेजमध्ये वैमानिक म्हणून काम करतो. त्यानंतर जेट एअरवेजनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभाग आणि एजन्सींना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराबद्दल प्रवाशांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

 

Web Title: Harbhajan Singh, who is from a pilot named Bloody Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.