Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 04:10 PM2021-08-22T16:10:53+5:302021-08-22T16:13:43+5:30
Afghanistan Taliban Crisis: एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला मान्यता द्यावी की नाही, यावर संमिश्र प्रतिक्रिया जगभरातून उमटताना दिसत आहे. भारतही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. (hardeep singh puri says caa necessary over afghanistan taliban crisis)
अफगाणिस्तानमध्ये आताच्या घडीला अराजकासारखी स्थिती आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. यातच केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज अधोरेखित झाल्याचे म्हटले आहे.
Taliban ला मोठा धक्का! आर्थिक कोंडी करण्यासाठी IMF ने घेतला महत्त्वाचा निर्णय
CAA गरजेचे आहे
अफगाणिस्तानमधून मायदेशात परतलेल्या काही शिख आणि हिंदू बांधनांबाबतचे एक वृत्त शेअर करत हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, आपल्या शेजारी म्हणजे अफगाणिस्तानधील अस्थिर परिस्थिती आणि ताज्या घटनांचा आढावा घेतला, तर आपले शिख आणि हिंदू बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. अशा परिस्थिती भारताने केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होते, असे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे.
तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय
अफगाणिस्तानातील हिंदू, शीख बांधवांना आश्रय देणार
अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.