‘महामार्ग अडविण्यास हार्दिकने सांगितले होते’
By admin | Published: October 23, 2015 03:43 AM2015-10-23T03:43:39+5:302015-10-23T03:43:39+5:30
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात १८ आॅक्टोबर रोजीच्या राजकोटमधील एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या तोंडावर मला पोलिसांनी ताब्यात घेतल्यास गुजरातमधील
अहमदाबाद : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात १८ आॅक्टोबर रोजीच्या राजकोटमधील एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या तोंडावर मला पोलिसांनी ताब्यात घेतल्यास गुजरातमधील सगळे महामार्ग अडवून ठेवा, असे पटेल समाजासाठी राखीव जागांची मागणी करणारे हार्दिक पटेल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले होते.
हार्दिक पटेल यांनी हा सामना उधळून लावण्याची धमकीही दिली होती. शहर पोलिसांनी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याच्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) ही माहिती देण्यात आली आहे. हा एफआयआर बुधवारी दाखल झाला. पटेल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांचे व कुलदीप नावाच्या एका व्यक्तीतील दूरध्वनीवरील संभाषणाचा उतारा त्यात देण्यात आला आहे. गरज निर्माण झाल्यास सुरेंद्रनगरला जोडणारा सायला गावानजीकचा महामार्ग तू अडवू शकतो का, असे हार्दिक त्याला विचारत असल्याचे ऐकू येते. (वृत्तसंस्था)