उपोषणाच्या १0 व्या दिवशी हार्दिक पटेल यांनी जाहीर केले मृत्युपत्र; प्रकृती ढासळली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 11:16 PM2018-09-03T23:16:00+5:302018-09-03T23:16:17+5:30
गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे.
हार्दिक यांच्या बँक खात्यातील ५0 हजार रुपयांपैकी २0 हजार रुपये आई-वडिलांना देण्याचे ठरविले असून, ३0 हजार रुपये चंदन नगरच्या गोशाळेला जाण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या व्हू टूक माफ जॉब या पुस्तकाची ३0 टक्के रॉयल्टी बहीण तसेच आई-वडिलांना आणि ७0 टक्के रॉयल्टी पाटीदार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १४ तरुणांच्या कुटुंबीयांना देण्यात यावी, असे म्हटले आहे.
हार्दिक पटेल यांनी २५ आॅगस्ट रोजी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे मला अशक्तपणा जाणवत असून, मला संसर्ग झाल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे.