तिरंग्याच्या अपमानाबद्दल हार्दिक पटेल यांना अटक

By admin | Published: October 20, 2015 04:02 AM2015-10-20T04:02:20+5:302015-10-20T04:02:20+5:30

गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणारे नेते हार्दिक पटेल यांना सोमवारी तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाच्या कठोर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Hardik Patel arrested for torture of Tricolor | तिरंग्याच्या अपमानाबद्दल हार्दिक पटेल यांना अटक

तिरंग्याच्या अपमानाबद्दल हार्दिक पटेल यांना अटक

Next

सुरत/ राजकोट : गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणारे नेते हार्दिक पटेल यांना सोमवारी तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाच्या कठोर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारा अशी चिथावणीजनक वक्तव्ये केल्याबद्दलही त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भारत-दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय क्रिकेट सामना उधळण्याची धमकी दिल्याबद्दल राजकोट येथे रविवारी हा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी गाडीच्या टपावर चढून तिरंगा हाती घेत तो चुरगळल्याचे व्हिडिओ फुटेजवरून स्पष्ट दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पढ्ढारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक केल्याचे राजकोटचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) गगनदीप गंभीर यांनी सांगितले.
३ आॅक्टोबर रोजी हार्दिक पटेल यांनी पोलिसांना ठार मारण्याची चिथावणी युवा कार्यकर्त्यांना दिली होती. त्याबद्दलही त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जन्मठेपेची तरतूद
पटेल यांच्याविरुद्ध सुरतमधील अमरोली पोलीस ठाण्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली कलम १२४ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबद्दल दोषी आढळल्यास अधिकाधिक जन्मठेप, तर किमान तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. (वृत्तसंस्था)

लेखी किंवा मौखिकरीत्या द्वेषपूर्ण शब्दांचा वापर, सरकारबद्दल अनादर दाखविणारे कृत्य करणे यासारख्या गुन्ह्यांसाठी ही शिक्षा ठोठावली जाते. कलम ११५ (गुन्ह्यांसाठी चिथावणी), १५३-ए (विविध गटांमध्ये वैमनस्याला प्रोत्साहन) ५५५-२ (दोन समुदायांना परस्परांविरुद्ध भडकविणे), ५०६ (धमक्या देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हार्दिक यांनी पढ्ढारी येथील स्थानिक न्यायालयातून जामीन मिळविल्यास त्यांना राष्ट्रध्वजाच्या अपमानाबद्दल राजकोट येथे अटक केली जाईल, असे सुरतचे शहर पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.

Web Title: Hardik Patel arrested for torture of Tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.