हार्दिक पटेलला जामीन, पण सुटका नाहीच
By admin | Published: July 9, 2016 02:54 AM2016-07-09T02:54:28+5:302016-07-09T02:54:28+5:30
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा नेता हार्दिक पटेल याला अहमदाबाद उच्च न्यायालयाने दोन प्रकरणांत शुक्रवारी जामीन मंजूर केला.
अहमदाबाद : गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा नेता हार्दिक पटेल याला अहमदाबाद उच्च न्यायालयाने दोन प्रकरणांत शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र मेहसाणा जिल्ह्यात आंदोलनादरम्यान झालेल्या हिेंसाचाराबाबतच्या गुन्ह्यात जामीन मिळाला नसल्याने हार्दिकला तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्याने सहा महिने गुजरातच्या बाहेरच राहावे आणि गुजरातमध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही, असे लिहून द्यावे, या अटी न्यायालयाने हार्दिकला जामीन मंजूर करताना घातल्या आहेत. राष्ट्रद्रोहाच्या दोन प्रकरणांत हार्दिकला तब्बल ९ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला. मेहसाणा हिंसाचार प्रकरणातील जामिनासाठीही त्याने अर्ज केला आहे. त्यावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.