दंगल भडकवल्याप्रकरणी हार्दिक पटेल दोषी, दोन वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:47 PM2018-07-25T12:47:26+5:302018-07-25T13:05:53+5:30
2015 साली पेटलेल्या पटेल आंदोलनादरम्यान भाजपा आमदार हृषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी न्यायालयाने पाटीदार नेता हार्दिक पटेल याला दोषी ठरवले असून, त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Next
अहमदाबाद - 2015 साली पेटलेल्या पटेल आंदोलनादरम्यान भाजपा आमदार हृषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी न्यायालयाने पाटीदार नेता हार्दिक पटेल याला दोषी ठरवले असून, त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Mehsana: Visnagar Court pronounces Hardik Patel guilty in a case related to vandalising BJP legislator Rushikesh Patel’s office in Visnagar during 2015 Patidar protests. #Gujarat (file pic) pic.twitter.com/IB5PN67zkI
— ANI (@ANI) July 25, 2018
पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 2015 साली गुजरातमध्ये आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला कालांतराने हिंसक वळण लागले होते. त्यावेळी भाजपा आमदार हृषिकेश पटेल यांच्या विसनगर येथील कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर आज निकाल देताना विसनगर येथील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.