हार्दिक पटेल स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 12:55 AM2015-09-20T00:55:27+5:302015-09-20T00:55:27+5:30

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरू झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले.

Hardik Patel localized | हार्दिक पटेल स्थानबद्ध

हार्दिक पटेल स्थानबद्ध

Next

अहमदाबाद : पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरू झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले. पटेल आरक्षण आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी शनिवारी त्यांच्या ३५ समर्थकांसह स्थानबद्ध केले.
दरम्यान, रात्री उशिराने हार्दिक आणि त्यांच्या समर्थकांना बिनाशर्त जामिन देण्यात आला. गुजरात सरकारने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यभरातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद केली.
प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय एकता यात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कारण पटेल यांच्या स्थानबद्धतेसाठी देण्यात आले होते. सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, कायदा व्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. कारण या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती. दांडी-अहमदाबाद मोर्चाची परवानगी न मिळाल्याने त्यांनी रॅलीबाबत कालपर्यंत गोपनीयता बाळगली होती. (वृत्तसंस्था)

अफवा पसरू नयेत म्हणून...
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी संपूर्ण गुजरातमधील मोबाइल, इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक पी.सी. ठाकूर यांनी दिली. सुरतमध्ये हार्दिक यांना ताब्यात घेताच पोलिसांनी २४ तास मोबाइल, इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्याबाबत अधिसूचना काढली.

आमचा आवाज चिरडण्याचा गुजरात सरकारचा डाव आहे. त्यांना आमच्यावर अत्याचार करायचे आहेत. राज्यात हिंसाचार माजावा अशी पोलीस आणि सरकारची इच्छा आहे. ही कारवाई लोकशाही भावनेच्या विरोधात आहे.
- हार्दिक पटेल

Web Title: Hardik Patel localized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.