Hardik Patel Health Update: हार्दिक पटेल यांची तब्येत खालावली; हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 06:08 PM2018-09-07T18:08:36+5:302018-09-07T18:10:26+5:30
Hardik Patel Health Update:
अहमदाबाद : गुजरातच्या पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांची प्रकृती खालावल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाटीदार समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागण्यांसाठी हार्दिक हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे.
हार्दिक यांनी 25 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. 10 व्या दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. चालण्य़ासाठी त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. गुरुवारी त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला होता.
Ahmedabad: PAAS leader Hardik Patel has been taken to hospital following a deterioration in his health. He is on an indefinite hunger strike since 13 days, demanding reservations for Patidar community and loan waiver for farmers. #Gujaratpic.twitter.com/CNzGy7Z1Bu
— ANI (@ANI) September 7, 2018
शुक्रवारी दुपारी हार्दिक पटेल यांची तब्येत बिघडल्याने अहमदाबाद येथील सोला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पटेल यांचे शेकडो समर्थकही हॉस्पिटलबाहेर दाखल झाले आहेत. अद्याप डॉक्टरांकडून पटेल यांच्या तब्येतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.