हार्दिक पटेलची 9 महिन्यानंतर जेलमधून सुटका
By admin | Published: July 15, 2016 12:35 PM2016-07-15T12:35:48+5:302016-07-15T12:35:48+5:30
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा नेता हार्दिक पटेल याची अखेर 9 महिन्यानंतर जेलमधून सुटका करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
सुरत, दि. 15 - गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा नेता हार्दिक पटेल याची अखेर 9 महिन्यानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला देशद्रोहाच्या आरोपाखाली ऑक्टोबर 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. राष्ट्रद्रोहाच्या दोन प्रकरणांत हार्दिकला तब्बल ९ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला. मेहसाणा हिंसाचार प्रकरणातील जामिनासाठीही त्याने अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला.
'मला आरक्षण हवं आहे, 56 इंचाची छाती नको. आमच्या समाजासाठी मी काम करत राहणार आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठीही मी तयार असल्याचं', जेलमधून सुटका झाल्यानंतर हार्दिक पटेल बोलला आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर सुरतमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला असून पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेत अडथळा न आणण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
अहमदाबाद उच्च न्यायालयाने हार्दिक पटेलला दोन प्रकरणांत जामीन मंजूर केला होता. मात्र मेहसाणा जिल्ह्यात आंदोलनादरम्यान झालेल्या हिेंसाचाराबाबतच्या गुन्ह्यात जामीन मिळाला नव्हता. अखेर या प्रकरणातही जामीन मिळाल्याने शुक्रवारी हार्दिक पटेलची कारागृहातून सुटका करण्यात आली. हार्दिक पटेलने सहा महिने गुजरातच्या बाहेरच राहावे आणि गुजरातमध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही, असे लिहून द्यावे, या अटी न्यायालयाने हार्दिकला जामीन मंजूर करताना घातल्या आहेत. तसंच सुटका झाल्यानंतर 48 तासांत गुजरात सोडावे अशी अटही घालण्यात आली आहे.
#WATCH: Hardik Patel released from Surat's Lajpore Central jail after 9 months, welcomed by supportershttps://t.co/1isqxj5MEK
— ANI (@ANI_news) July 15, 2016
Surat: Hardik Patel who was arrested in connection with 2 sedition cases,released from Lajpore Central Jail in Surat pic.twitter.com/rDk7ZWLMXf
— ANI (@ANI_news) July 15, 2016