हार्दिक यांना सात दिवसांची कोठडी
By admin | Published: October 25, 2015 11:29 PM2015-10-25T23:29:30+5:302015-10-25T23:29:30+5:30
पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांची राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात शनिवारी रात्री उशिरा येथील एका न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
Next
अहमदाबाद : पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांची राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात शनिवारी रात्री उशिरा येथील एका न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
हार्दिक यांना शनिवारी रात्री उशिरा महान्याय दंडाधिकारी एस.जे. ब्रह्मभट्ट यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. यानंतर पहाटेपर्यंत चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली. या आंदोलनास कुठून अर्थसाहाय्य मिळते, याबाबत माहिती मिळवायची असल्याचे पोलिसांनी सांगितले.