सॅल्यूट! लहानपणीच वडील वारले, आई विडी कारखान्यात मजूर; यूट्यूबवर शिकून 'ती' झाली डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:52 AM2022-11-12T11:52:25+5:302022-11-12T11:54:50+5:30
हरिकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
ध्येय निश्चित असेल आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. अनेक संकटे मागे टाकून यशाच्या मार्गावर पुढे जातात. निजामाबाद जिल्ह्यातील नंदवाडा येथील रहिवासी असलेल्या हरिकाने हे सिद्ध केलं आहे. यूट्यूब व्हिडिओच्या मदतीने तिने एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची आई विडी कारखान्यात मजूर आहे. हरिकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
टीआरएस एमएलसी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता कलवकुंतला यांनी हरिका आणि तिच्या आईची भेट घेतली. 'स्वप्न पाहण्याची हिंमत करा आणि ती पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करणे थांबवू नका. एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हरिकाची ही कहाणी आहे. यूट्यूब व्हिडिओवरुन शिक्षण घेऊन तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मी तिला आणि त्याच्या आईला भेटले आणि तिच्या फीचा पहिला हप्ता देऊन स्वप्नांना आधार दिल्याचे' कविता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दुसर्या ट्विटमध्ये कविता यांनी लिहिलं की, निजामाबादमधील एका विडीच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका आईची मुलगी, हरिका ही प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. जी आपली स्वप्ने जगण्याची निवड करतात. हरिका आणि तिच्या आईला भेटणे आणि त्यांच्या अतुलनीय प्रवासाचा एक भाग होणे हा खरोखरच एक आशीर्वाद आहे. एमएलसी कविता यांनी हरिकाला भेटतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
लहानपणीच वडील वारले
हरिका लहान असतानाच तिचे वडील शिवकुमार यांचे निधन झाले होते. त्याची आई अनुराधा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विडी कारखान्यात काम करते. इंटरमिजिएटमध्ये चांगले मार्क्स मिळवल्यानंतर हरिकाने डॉक्टर होण्याचे ध्येय ठेवले.
नीट परीक्षेत राज्यात 700 वा क्रमांक
हरिकाने यावर्षीच्या नीट परीक्षेत ऑल इंडिया लेव्हलवर 40000 रँक मिळवली, तर राज्य स्तरावर तिची रँक 700 होती. तिला सीट मिळाली असली तरी तिचा त्रास अद्याप संपलेला नाही. एमबीबीएसच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हरिकाला आणखी मदत करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"