हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता

By admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:42+5:302015-04-20T13:10:02+5:30

तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

Harimanam Week and Parayan Sohali | हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता

हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता

Next

नेवासा : तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. गोशाळेचे उद्घाटनही यावेळी झाले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने नामवंतांची प्रवचने, कीर्तने झाली.
विकासप्रश्नी चर्चा
करंजी : पाथर्डी तालुक्यातील विविध रस्ते व इतर प्रश्नी तालुक्यातील शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात जि.प. सदस्या उषा कराळे, सेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, देविदास वांढेकर, सरपंच शिवाजी मचे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.
अध्यक्षपदी खाटीक
नेवासा : तालुक्यातील सुलतानपूर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी नारायण खाटीक यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संचालकांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
भाविकांची गर्दी
पाथर्डी : शनि अमावस्येनिमित्त मायंबा येथे शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. नाथांचा जयघोष करीत मढी, मायंबा येथे संजीवन समाधीसह वृध्देश्वरच्या स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
खंडित वीज पुरवठा
पाथर्डी : तालुक्यातील धारवाडीसह गितेवाडी, डोंगरवाडी येथील वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज पुरवठा करणार्‍या मुख्य लाईनच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
शाळेला पुरस्कार
टाकळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील बेटवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक मिळाला, अशी माहिती पोपट ठाणगे यांनी दिली.,
टाकळीत सप्ताह
टाकळीढोकेश्वर : येथील दत्त मंदिरात १९ ते २६ एप्रिल याकालावधीत डॉ.नारायण महाराज जाधव व बाळासाहेब महाराज पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात नामवंतांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.,
बससेवा सुरु
ढवळपुरी : सुतारवाडी-भगवानगड या सुरु करण्यात आलेल्या बससेवेचा शुभारंभ श्री क्षेत्र भगवानगड येथे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज यांच्या हस्ते झाला. बससेवा सुरु झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Harimanam Week and Parayan Sohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.