"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:05 PM2023-09-28T13:05:52+5:302023-09-28T13:08:51+5:30

हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जीव वाचवले आहेत. अनेक दशकांपासून ते दिल्लीत मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत.

harjinder singh runs free auto ambulance saves many lives | "शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

फोटो - nbt

googlenewsNext

हरजिंदर सिंग हे गेली कित्येक वर्षे ऑटोरिक्षा चालवतात. त्यांच्या रिक्षात नेहमी फर्स्ट एड किट असतं. या किटमध्ये सर्व आपत्कालीन वस्तू जसे की बँडेज, अँटीसेप्टिक लोशन, बर्न क्रीम आणि पॅरासिटामॉल आहे. त्यांनी याबाबत प्रशिक्षणही घेतलं आहे. हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जीव वाचवले आहेत. अनेक दशकांपासून ते दिल्लीत मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मानवतेची ही सेवा करत राहणार असल्याचे ते सांगतात.

हरजिंदर सिंग 80 वर्षांचे आहेत. यापूर्वी ते ट्रॅफिक वॉर्डन होते. ते ऑटोरिक्षा युनियनचे महासचिवही राहिले आहेत. हरजिंदरन यांनी 1964 मध्ये ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. त्यांना ऑटोरिक्षा चालवून 55 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एकदाही त्यांनी वाहतुकीचा नियम मोडला नाही. तसेच वाहतूक पोलिसांनीही त्यांना कधीच अडवलं नाही. हरजिंदर सिंग यांची रिक्षा समोरून पाहिली तर राजधानी दिल्लीत चालणाऱ्या इतर रिक्षांप्रमाणेच दिसते. मागून पाहिल्यावर फरक समजू शकतो. 

मागच्या बाजूला रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी मोफत रुग्णवाहिका असा एक संदेश लिहिला आहे. दिल्लीतील पुरानंतर त्यांना ही कल्पना सुचली. त्या काळात त्यांनी शीख समाजातील इतर लोकांसोबत तत्परतेने सेवा केली. पुरानंतरही त्यांची सेवा सुरूच होती. त्यांनी मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. दिल्लीतील भजनपुरा भागात हरजिंदर मोठा मुलगा आणि कुटुंबासह राहतात. रस्त्यात मदतीची गरज असलेल्या लोकांना ते मदतीचा हात देतात. 

हरजिंदर आपल्या रिक्षामधून औषधे घेऊन जातात. त्यात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश असतो. एक डोनेशन बॉक्स देखील आहे. ते स्वत: कोणाकडे पैसे मागत नाही. पण ज्याला पैसे द्यायचे आहेत ते लोक बॉक्समध्ये पैसे टाकू शकतात. हरजिंदर त्याच पैशातून औषधं खरेदी करतात. वय लक्षात घेता त्यांनी आता हे काम करणं सोडावं असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण, शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचं हरजिंदर सिंग सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: harjinder singh runs free auto ambulance saves many lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.