सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:41 AM2024-07-07T08:41:54+5:302024-07-07T08:42:01+5:30

फळांसोबत दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर

Harmful chemicals are entering the stomach with fruits findings in Research | सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती

सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती

नवी दिल्ली : भाज्या आणि फळे सकस मानली जातात. रोजच्या आहारात त्यांचा समावेश केला जातो. सिझन संपला तरी काही फळे बाजारात हमखास मिळत असतात. त्यामुळे त्यांचे सेवन दररोज केले जात असते; परंतु या फळांसोबत तुम्ही दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 

छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी महाविद्यालयाचे कीटक विज्ञानाचे वैज्ञानिक डॉ. गजेंद्र चंद्राकर यांनी केलेल्या संशोधनात हा खुलासा झालेला आहे. 
बाजारात विकण्यासाठी फळे बागेतून शहरात आणावी लागतात. मार्केटमध्ये साठवून ठेवावी लागतात. या काळात फळे टिकावीत, त्यांचे आयुष्य वाढावे, ती लवकर खराब होऊ नयेत यासाठी डीडीटी, इथरेल तसेच जिब्रालिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. घातक रसायनांचा वापर करून ती पिकविली जातात मगच तुम्हा-आम्हाला विकली जात असतात. 

फळे टिकवणे आणि पिकवण्यासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे त्वचेचे विकार, डायबेटिस, पीसीओडी विकार होण्याचा धोका वाढतो. 
सध्या सफरचंद आणि द्राक्षांचा सिझन नाही. तरीही ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. कारण अनेक महिने शीतगृहात ठेवलेली फळे आता विक्रीसाठी बाहेर काढण्यात आली आहेत.

कोणत्या दुष्परिणामांची भीती? 
लहान वयात चष्मा लागणे 
एकाग्रता कमी होणे 
तणाव वाटणे
भूक न लागणे
डोळ्यांभोवती काळा पट्टा 
कॅन्सर आजार
अस्थमा होण्याची भीती

अधिक काळ टिकावी यासाठी फळांचे लसीकरण होते. द्राक्षांवर डायक्लोवास २६ हे रसायन वापरतात. द्राक्षे टिकून रहावी यासाठी डीडीटीचा वापर होतो. 

फळांमध्ये घातक रसायने किती?
आंबा ०.६५६८ 
सफरचंद ०.६०८६ 
द्राक्षे ०.५८३७ 
गाजर ०.३४६९
केळी ०.२२२१ 

३०% पेक्षा अधिक कीटकनाशके
बाजारात विकल्या जाणाऱ्या शेकडो फळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कीटकनाशके असल्याचे अनेक वैज्ञानिक अभ्यासात आढळले आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जादा प्रमाणात कीटकनाशकांचा वापर म्हणजे मोठ्या आजारांना निमंत्रण ठरते. 

कोणती काळजी घ्यावी?

फळे खाण्याआधी कमीत कमी तीन तास पाण्यात बुडवून ठेवा.
मोसमात येणाऱ्या फळांचे सेवन करण्यास प्राधान्य द्या.
हायब्रीड फळांचा वापर कमीत कमी करावा
 

Web Title: Harmful chemicals are entering the stomach with fruits findings in Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.