Harsha Richhariya : Video - "माझ्या नावाने पैसे मागितले, अश्लील व्हिडीओ..."; हर्षा रिछारियाने कोणाची केली तक्रार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:18 IST2025-03-03T12:18:17+5:302025-03-03T12:18:41+5:30
Harsha Richhariya : हर्षा रिछारियाचा हातात कागद घेऊन भावना व्यक्त करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Harsha Richhariya : Video - "माझ्या नावाने पैसे मागितले, अश्लील व्हिडीओ..."; हर्षा रिछारियाने कोणाची केली तक्रार?
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान लक्ष वेधून घेणारी व्हायरल गर्ल हर्षा रिछारिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने भोपाळमधील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हर्षा रिछारियाचा हातात कागद घेऊन भावना व्यक्त करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हर्षा व्हिडिओमध्ये म्हणाली की, "महाकुंभापासून आतापर्यंत, माझ्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर अनेक फेक आयडी तयार केले गेले आहेत, जे माझ्या नावाने खूप फ्रॉड करत आहेत आणि माझ्या नावाने जाहिरातींचे व्हिडीओ देखील बनवत आहेत, जे मी करत नाही."
५५ फेक आयडीविरोधात तक्रार दाखल
"माझ्या नावाने पैसे मागितल्याबद्दल, माझ्या नावाने एआय व्हिडीओ आणि अश्लील व्हिडीओ बनवल्याबद्दल, जगभरातील अनेक गोष्टींसाठी मी ५५ आयडींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ही एफआयआरची कॉपी आहे. मला आशा आहे की, या सर्व लोकांना लवकरच यासाठी शिक्षा होईल."
"काही धर्मविरोधी लोक AI वापरुन माझे व्हिडीओ..."; ढसाढसा रडली हर्षा रिछारिया
हर्षाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं. "काही धर्मविरोधी लोक AI वापरून माझे व्हिडीओ एडिट करून माझी बदनामी करत आहेत. महादेवाने मला हिंमत दिली आहे, तोपर्यंत लढेन. मी याचा सामना करेन. ज्या दिवशी मी तुटून पडेन, त्या दिवशी मी सर्वांची नावं लिहून आत्महत्या करेन" असं हर्षाने म्हटलं होतं.