लोकगीत गायिका हर्षिता दहियाची हरयाणात हत्या, येत होत्या धमक्या; जवळून घातल्या गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:01 AM2017-10-19T02:01:17+5:302017-10-19T02:01:44+5:30
लोकगीत गायिका हर्षिता दहिया (२२) हिची मंगळवारी हरयाणातील पानिपत जिल्ह्यात अज्ञात इसमांनी गोळ््या घालून हत्या केली. मला नुकतीच काही लोकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, असा व्हिडीओ तिने त्या आधी समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.
चंदीगढ : लोकगीत गायिका हर्षिता दहिया (२२) हिची मंगळवारी हरयाणातील पानिपत जिल्ह्यात अज्ञात इसमांनी गोळ््या घालून हत्या केली. मला नुकतीच काही लोकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, असा व्हिडीओ तिने त्या आधी समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.
हर्षिता दहिया ही चामरारा (जिल्हा पानिपत) खेड्यात शेतकºयांसाठी झालेल्या कार्यक्रमाहून परतत असताना, तिचे वाहन दोन जणांनी अडविले आणि तिचा गळा व कपाळावर सहा गोळ््या झाडल्या. ती जागीच मरण पावली, असे पोलिसांनी सांगितले.
हरयाणातील या उद्योगातील (संगीत, गायन) काही लोक मला फोनवर तडजोड करून घे, म्हणून धमक्या द्यायचे. व्हिडीओ डिलीट करून टाक, अन्यथा परिणामांना तोंड दे, अशी धमकी आपणास आल्याचे दहियाने यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते.
तिने हा लाइव्ह व्हिडीओ फेसबुकवर १२ आॅक्टोबर रोजी रेकॉर्ड केला होता. त्यात तिने काही लोकांनी तिला विनयभंग करण्याची धमकी दिली होती, असा आरोप केला होता. फेसबुकवर धमक्या देणाºया लोकांची नावे व फोन नंबर्स जाहीर करीन व ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार देईन, असेही ती म्हणाली होती. परंतु तिने तशी तक्रार दिली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. फेसबुकवरील लाइव्ह व्हिडीओ मी डिलीट करणार नाही. मृत्यूला मी घाबरत नाही, असे हर्षिता म्हणाली होती. मारेक-यांना पकडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी दोन तुकड्यांची स्थापना केली आहे व या हत्येमागे वैयक्तिक वैर होते का, याचा तपास ते करीत आहेत. चौकशी सुरू असल्यामुळे आताच काही सांगणे योग्य ठरणार नाही, असे पानिपतचे पोलीस अधीक्षक राहुल शर्मा म्हणाले.
मेहुण्यावरच संशय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षिता दहियाचा मेहुणा दिनेश कुमार याच्यावर पोलिसांचा संशय आहे. २०१३ मध्ये दिनेश कुमारने हर्षितावर बलात्कार केला होता. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. तिच्या हत्येमागे त्याचा हात असू शकतो. दिनेश कुमार हा २०१५ मध्ये हर्षिताच्या आईच्या झालेल्या खुनातही आरोपी आहे.