हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत १०० वनौषधींचे रोपण
By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:06+5:302015-07-12T21:58:06+5:30
अहमदनगर : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सावेडी येथे सामाजिक वनीकरण विभाग मूकबधीर विद्यालय व डोके फौंडेशनच्यावतीने शनिवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी १०० वनौषधींचे रोपण करण्यात आले़ यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे म्हणाले, सध्या सर्वत्र पर्यावरणाचा र्हास होत आहे़ पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने पाऊस वेळेवर होत नसून, दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ अशा परिस्थितीत पर्यावरण चळवळ व्यापक होवून लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़
Next
अ मदनगर : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सावेडी येथे सामाजिक वनीकरण विभाग मूकबधीर विद्यालय व डोके फौंडेशनच्यावतीने शनिवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी १०० वनौषधींचे रोपण करण्यात आले़ यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे म्हणाले, सध्या सर्वत्र पर्यावरणाचा र्हास होत आहे़ पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने पाऊस वेळेवर होत नसून, दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ अशा परिस्थितीत पर्यावरण चळवळ व्यापक होवून लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़ यावेळी बलभीम डोके यांनी डोके फौंडेशनतर्फे १ लाख बहुपयोगी अशा वृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला़ मधुकर भावले यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धानासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले़ यावेळी अरुण मानकर, शरद मानकर, नारायण चूग, एस़पी़ जोशी, नीलिमा खरारे, सुनीता मानकर, नंदकुमार गोरे, महेंद्र मानकर, अक्षय मानकर, विद्या भावले यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते़