हरियाणामध्ये गोहत्या गुन्ह्यांत 6 पैकी 1 आरोपी हिंदू

By admin | Published: October 26, 2016 10:32 AM2016-10-26T10:32:47+5:302016-10-26T10:39:18+5:30

हरियाणामध्ये गोहत्या कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 6 पैकी एक आरोपी हा हिंदू असल्याची माहिती समोर येत आहे.

In Haryana, 6 out of 6 accused in the case of cow slaughter | हरियाणामध्ये गोहत्या गुन्ह्यांत 6 पैकी 1 आरोपी हिंदू

हरियाणामध्ये गोहत्या गुन्ह्यांत 6 पैकी 1 आरोपी हिंदू

Next

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 26 - हरियाणामध्ये गोहत्या कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 6 पैकी एक आरोपी हा हिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. 2014 साली संपूर्ण बहुमत मिळवत हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांचे सरकार सत्तेत आले. यानंतर आश्वासनपूर्ती त्यांनी करत देशभरात गोहत्येविरोधातील कठोर कायदा अमलात आणला. हरियाणामधील भाजपा सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर गोहत्या कायद्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
 
गेल्या आठ महिन्यांत येथील पोलिसांनी गाईंची तस्करी आणि हत्या प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये एकूण 513 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात जवळपास 86 हिंदू, 421 मुस्लिम आणि उर्वरित शीख नागरिकांचा समावेश आहे. गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन अॅक्ट 2015नुसार, 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्ट 2016 पर्यंतची ही आकडेवारी पोलिसांनी एकत्रितपणे मांडली आहे. यातील अधिक प्रकरणं ही गो-तस्कराशी असून काही गुन्हे गोहत्या आणि गोमांस विक्रीचेदेखील आहेत. 
 
यातील आतापर्यंत एकूण 170 जणांना अटक करण्यात आली आहे. तर मेवात, हिसार, फतेहाबाद, मेहाम, भिवानी, रेवाडी, महेंद्रगड, यमुनानगर आणि पानीपतमध्ये सर्वाधिक जास्त गाईंच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, 'गाईंच्या तस्करी प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सर्व धर्मीय लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे', अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. दरम्यान, गो-तस्कर पोलिसांकडून अटकेची कारवाई टाळण्यासाठी, हिंदूंचा वापर केवळ गाईंची ने-आण करण्यासाठी करतात, असा दावा गोरक्षकांनी केला आहे.
 
तर दुसरीकडे, 'गाईंच्या तस्करी प्रकरणात आर्थिक फायदा आणि बेरोजगारीमुळे काही हिंदू सहभागी होतात', असे हरियाणातील एका गोशाळेच्या अध्यक्षाने सांगितले आहे. तर काही जण गोहत्येचे राजकारण करत असून हरियाणातील हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच हिंदूंप्रमाणे मुस्लिम समाजदेखील गाईंचा तितकाच आदर करतो, असे येथील मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे आहे.  
 

Web Title: In Haryana, 6 out of 6 accused in the case of cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.