हरयाणामध्ये धुक्यामुळे 50 वाहनांचा अपघात, 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 11:08 IST2018-12-24T14:21:47+5:302018-12-29T11:08:40+5:30
हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

हरयाणामध्ये धुक्यामुळे 50 वाहनांचा अपघात, 7 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हायवेवर वेगाने येणाऱ्या दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर त्यामागे असलेली इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
#Haryana: 7 killed in 50 vehicle pileup on Rohtak-Rewari highway due to dense fog conditions pic.twitter.com/3Wq7AjBWf9
— ANI (@ANI) December 24, 2018