Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:02 PM2024-10-08T20:02:04+5:302024-10-08T20:03:04+5:30

'आप'साठी अधिक चिंतेचा विषय म्हणजे, दिल्लीला लागून असलेल्या जागांवरही त्यांच्या उमेदवारांची धूळधाण उडाली आहे. एनसीआरला लागून असलेल्या भागातील तर जवळपास सर्व जागांवर आप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

haryana assembly election results 2024 bjp wins seats near delhi aam aadmi party lost badly | Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!

Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!


हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) सलग तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. महत्वाचे म्हणजे, हरियाणात पहिल्यांदाच एखादा पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे. एकीकडे हरियाणा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे 89 जागांवर संपूर्ण ताकदीनिशी उतरणाऱ्या आम आदमी पक्षाच्या वाट्यालाही निराशाच आली आहे. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. 'आप'साठी अधिक चिंतेचा विषय म्हणजे, दिल्लीला लागून असलेल्या जागांवरही त्यांच्या उमेदवारांची धूळधाण उडाली आहे. एनसीआरला लागून असलेल्या भागातील तर जवळपास सर्व जागांवर आप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

गुडगावमध्ये भाजपच्या उमेदवाराने 68 हजार मतांनी विजय मिळवला आहे. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. निशांत आनंद यांना केवळ 2177 मते मिळाली आहेत. तो चौथा स्थानावर राहिले. गुरुग्राम जिल्ह्यातील बादशाहपूर मतदारसंघात भाजपचे राव नरबीर सिंग यांनी 60 हजार मतांनी विजय मिळवला आहे. येथे आपचे बीरसिंह बिरू सरपंच चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 12943 मते मिळाली. सोहना येथून भाजपचे उमेदवार तेजपाल तंवर 11675 मतांनी विजयी झाले. येथे 'आप'चे धर्मेंद्र खटाना 2680 मतांसह सहाव्या स्थानावर रिहिले. पतौडीमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रदीप जटौली यांना केवळ 1874 मते मिळाली आहे.

बहादुरगड येथे कुलदीप सिंह चिकारा यांना 966 मते मिळाली. ते सहाव्या स्थानावर राहिला. येथे अपक्ष उमेदवार राजेश जून 41999 मतांनी विजयी झाले. सोनीपतच्या राय विधानसभा मतदारसंघात आपचे राजेश सरोह आठव्या स्थानावर आहेत. त्यांना केवळ 281 मते मिळाली. येथे भाजपच्या कृष्णा गेहलावत 4673 मतांनी विजयी झाल्या आहेत त्यांना एकूण 64614 मते मिळाली. खारखोडा जागेवर भाजपचे पवन खरखोडा 56 हजार हून अधिक मतांनी विजयी झाले तर आपचे मनजीत फरमान यांना केवळ 397 मते मिळाली.

फरीदाबाद येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रवेश मेहता यांना केवळ 926 मते मिळाली. येथे भाजपचे विपुल गोयल 48 हजार मतांनी विजयी झाले. फरीदाबाद एनआयटी मधून आपचे रवी डागर यांना 1415 मते मिळाली. येथेही भाजपचे सतीशकुमार पघना 33 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. बल्लभगडमधून आपचे उमेदवार रवींद्र फौजदार यांना 6634 मते मिळाली. या जागेवरही भाजपचे मूल चंद्र शर्मा विजयी झाले. फरीदाबादच्या तिगाव मतदारसंघातून आपचे आबाश चंडेला यांना 5669 मते मिळाली. ते पाचव्या स्थानावर राहिले. तिगावमध्ये भाजपचे राजेश नागर विजयी झाले. जिल्ह्यातील पृथला जागेवर आपचे उमेदवार कौशल तातारपूर यांना केवळ 706 मतांवर समाधान मानावे लागले. येथे भाजपचे रघुवीर तेवतिया 20 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Web Title: haryana assembly election results 2024 bjp wins seats near delhi aam aadmi party lost badly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.