हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 22:42 IST2025-03-15T22:38:40+5:302025-03-15T22:42:15+5:30
Surendra Jawahar Bjp: एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एक व्यक्ती भाजपच्या मंडळ अध्यक्षाची गोळी झाडून हत्या करताना दिसत आहे.

हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद
BJP Murder News: हरयाणामध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शेजाऱ्यानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र जवाहरा असे मृत्यू झालेल्या भाजप नेत्याचे नाव असून, ते भाजपचे मंडळ अध्यक्ष होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दुकानात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणात सोनीपत शहरात ही घटना घडली आहे. सुरेंद्र जवाहरा हे भाजपचे मुंडलानाचे मंडल अध्यक्ष होते. त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. शुक्रवारी (१४ मार्च) रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली.
भाजप नेत्याच्या हत्येचे कारण काय?
सुरेंद्र जवाहरा यांच्या हत्येचे कारणही तपासातून समोर आले आहे. सुरेंद्र जवाहरा यांची हत्या जमिनीच्या वादातून झाली.
सुरेंद्र जवाहरा यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या आत्याची जमीन खरेदी केली होती. त्यावरून वाद सुरू होता.
काही दिवसांपूर्वी दिली होती धमकी
आरोपीने काही दिवसांपूर्वी सुरेंद्र जवाहरा यांना खरेदी केलेल्या जमिनीवर पाऊलही ठेवू नको, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सुरेंद्र जवाहरा आणि आरोपीमध्ये वादही झाला होता.
त्यानंतर शुक्रवारी भाजप नेता सुरेंद्र जवाहरा हे खरेदी केलेल्या शेतात लागवड करण्यासाठी गेले होते, पण आरोपी तिथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाला. नंतर सुरेंद्र जवाहरा तिथून निघून आले.
सोनीपत में बीजेपी नेता के मर्डर की लाइव वीडियो #viralvideo#CCTVFootagepic.twitter.com/PDLCpqcO0W
— TRUE STORY (@TrueStoryUP) March 15, 2025
रात्री साडेनऊ वाजता सुरेंद्र जवाहरा हे त्यांच्या सोनीपत येथील दुकानामध्ये बसलेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. झटापट झाल्यानंतर आरोपीने पिस्तुल काढले आणि त्यांची हत्या केली.