हरियाणाच्या मुलाने केलं जपानी मुलीशी लग्न; परदेशी नववधू म्हणाली- "नमस्ते इंडिया, मी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:25 PM2023-02-17T17:25:40+5:302023-02-17T17:27:50+5:30
झज्जरच्या मुलाने परदेशी सून आणली आहे. दोघांनी झज्जरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाचे विधी पार पाडले. या लग्नामुळे कुटुंबीय खूप खूश आहेत.
कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार हरियाणातील झज्जरचा सुनील यादव आणि जपानच्या रेयोको ओकामोतो यांच्यात घडला आहे. झज्जरच्या मुलाने परदेशी सून आणली आहे. दोघांनी झज्जरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाचे विधी पार पाडले. या लग्नामुळे कुटुंबीय खूप खूश आहेत.
विशेष म्हणजे सुनील सिंगापूरच्या राकुटन कंपनीत इंजिनिअर आहे. तर नववधू सिंगापूरमध्ये काम करते. दोघांची भेट एका डेटिंग एपवर झाली. यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. सुनीलने सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला सहमती दर्शवली आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्यासाठी रेयोको ओकामोतो त्यांच्यासोबत आली.
सुनील आणि रेकोच्या लग्नात वराच्या बाजूच्या आणि वधूच्या बाजूच्या महिलांनी डीजेच्या तालावर नृत्य केलं या लग्नाबाबत रेयोकोने नमस्ते इंडिया म्हणत लग्नाचा आनंद व्यक्त केला. रेयोको म्हणाली, "मी भारतीय संस्कृती शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुनीलसोबत लग्न करून मला खूप आनंद झाला आहे.
सुनीलचे आई-वडील झज्जर येथे राहतात. त्याला दोन भाऊ असून त्यांचे लग्न झाले आहे. सुनीलने जपानी तरुणीबद्दल घरी सांगितल्यावर आई म्हणाली की, तिच्याशी कसं बोलणार. दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नाही. मात्र, तिने मुलाच्या प्रेमाला होकार दिला. सून हातवारे करून थोडं हिंदीत बोलते असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"