सेलिब्रिटींपेक्षा हरियाणात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लोकप्रिय; शब्द आणि कृती एकच असल्याने कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:08 IST2025-01-23T16:07:54+5:302025-01-23T16:08:26+5:30

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या १०० दिवसांच्या कार्यकाळाने अमिट छाप सोडली आहे.

Haryana Chief Minister Naib Singh Saini has left an impression on the people in his second 100 day term | सेलिब्रिटींपेक्षा हरियाणात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लोकप्रिय; शब्द आणि कृती एकच असल्याने कौतुक

सेलिब्रिटींपेक्षा हरियाणात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी लोकप्रिय; शब्द आणि कृती एकच असल्याने कौतुक

Haryana CM Nayab Singh Saini: १०० दिवसांच्या दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी जनतेच्या मनात छाप सोडली आहे. वर्षभरापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या हे मितभाषी शैलीमुळे इथल्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे सध्या राज्यातील सेलिब्रिटीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरत आहेत. हरियाणा राज्याच्या स्थापनेनंतर नायब सिंग सैनी हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यक्षम कार्यशैलीमुळे इतक्या कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे हरियाणात तिसऱ्यांदा जनतेने भाजपला सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला.

सोशल मीडियावरही मुख्यमंत्री सैनी ट्रेंडिंग

माजी उपपंतप्रधान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री चौधरी देवी लाल हे देखील त्यांच्या अशाच प्रकारच्या स्वभावामुळे लोकप्रिय नेते होते आणि त्यामुळेच त्यांना ताऊ ही पदवी देण्यात आली होती, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या अनोख्या कार्यशैलीने हरियाणाच्या राजकारणात त्याचे वेगळे स्थान निर्माण झालं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुख्यमंत्री सैनी हे ट्रेंड करत असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पंतप्रधानांनीही मुख्यमंत्र्यांना दिली  तीन 'व्ही' ही पदवी 

पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुख्यमंत्र्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले आहेत. पंतप्रधान श्री मोदी जेव्हाही हरियाणातील कोणत्याही मोठ्या राजकीय मंचावर किंवा इतर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येतात, तेव्हा ते आपल्या भाषणात नायब सिंग सैनी यांचा उल्लेख  तीन व्ही म्हणून करतात. पंतप्रधान म्हणतात की नायबसिंग सैनी हे विनम्र, विवकेशील व विद्वान व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी इतक्या कमी कालावधीत मुख्यमंत्री म्हणून राजकीय लोकप्रियता मिळवली आहे.

मुख्यमंत्री सैनी यांच्या कार्यकाळात आता राज्यातील जनता सरकारचा शब्द आणि कृती एकच आहे असं म्हणते. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या काळात राज्यात दडपशाही किंवा भ्रष्टाचार नाही, कोणताही खर्च न करता हजारो नोकऱ्या दिल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान, हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने २५ हजारांहून अधिक गट क उमेदवारांचे निकाल जाहीर केले. त्यावेळी नायब सिंग सैनी यांनी आश्वासन दिलं होतं की आधी नियुक्त्यांची घोषणा करु आणि त्यानंतरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी नायब सिंह सैनी यांनी पंचकुलामध्ये शपथ घेण्यापूर्वी २५ हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः शपथ घेतली.

विरोधकांची वळवली मनं

एवढंच नाही तर राज्यातील अनेक विरोधी पक्षनेतेही मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीने प्रभावित झाले आहेत. सामान्यत: हरियाणाच्या राजकारणात विरोधकांची परंपरा आहे की ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या सभेला हजेरी लावण्यासाठी येतात तेव्हा ती सभा उधळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र विरोधकांचा हा कल बदलण्यात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यशस्वी ठरले आहेत.
 

Web Title: Haryana Chief Minister Naib Singh Saini has left an impression on the people in his second 100 day term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.