"झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा", विद्यार्थ्यांसाठी नवी योजना; 'या' राज्याने केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:07 PM2021-06-21T16:07:08+5:302021-06-21T16:19:11+5:30
Extra Marks For Class 8 to 12 Students Nurturing Plant Sapling : विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करणाऱ्या आणि झाडांची काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण म्हणजेच एक्स्ट्रा मार्क्स देण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत वृक्षारोपण करणाऱ्या आणि झाडांची काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण म्हणजेच एक्स्ट्रा मार्क्स देण्यात येणार आहेत. ही योजना राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अतिरिक्त गुणांसाठीच्या तरतुदीचा मसुदा लवकरच तयार केला जाईल असंही म्हटलं आहे. आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पंचकुला जिल्ह्यातील मोरनी हिल्समध्ये असलेल्या "नेचर कॅम्प" थापली येथे पंचकर्म आरोग्य केंद्राच्या उद्घाटनानंतर ही घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांनी रविवारी पंचकूला जिल्ह्यातील हॉट एअर बलून, पॅराग्लाइडिंग आणि वॉटर स्कूटर यासारख्या रोमांचक खेळांमध्ये सहभाग घेतला. "आजूबाजूच्या भागातील तरुणांना पॅराग्लाइडिंगचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या उपक्रम राबविण्यासाठी क्लबची निर्मिती करण्यात येईल. दिग्गज खेळाडू मिल्खा सिंग यांचे नाव या क्लबचे नाव दिले जाईल" असं देखील खट्टर यांनी यावेळी म्हटलं आहे.
पंचकूला के मोरनी हिल्स स्थित नेचर कैंप थापली में पंचकर्म वैलनेस सेंटर का उद्घाटन किया। इसके अलावा डिजिटल रूप से नक्षत्र वाटिका, नवग्रह वाटिका और राशि वन की भी आधारशिला रखी। pic.twitter.com/8y8osTVLGu
— Manohar Lal (@mlkhattar) June 20, 2021
"नवीन धोरणाअंतर्गत हरियाणामध्ये ऑक्सी-वन ही संकल्पना पुढे नेण्यासाठी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रोपांची देखभाल व संगोपन करण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येतील" असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच "पूर्वी लोकांना रोमांचक खेळांचा आनंद घेण्यासाठी मनाली व इतर ठिकाणी खूप दूर जावे लागत असे. शिवालिक टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर मोरनी हिल्सच्या क्षेत्रात अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात करून लोकांना या रोमांचकारी खेळात सहभागी होण्याची संधीच मिळणार आहे. त्यासोबतच आजूबाजूच्या परिसराचा आर्थिक विकास होईल" असंही म्हटलं आहे.
हरियाणा वीरों की धरती है और यहां के बच्चे-बच्चे में खेलों के प्रति रूचि है। प्रदेश में धार्मिक से लेकर साहसिक पर्यटन को भी बढ़ावा देने का हम पूरा प्रयास कर रहे हैं।
— Manohar Lal (@mlkhattar) June 20, 2021
आज मोरनी हिल्स के पास टिक्करताल क्षेत्र में विभिन्न एडवेंचर गतिविधियों में सम्मिलित हुआ। pic.twitter.com/Whm8BNToC1
पंचकुला व त्याच्या आसपासच्या भागांच्या एकत्रित विकास आराखड्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि पंचकुला देशातील सर्वात विकसित शहर होण्यास मदत होईल. पंचकुला एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत मोरनी हिल्समध्ये वनविभागाने अकरा नैसर्गिक रस्ते तयार केले आहेत. स्थानिक तरुण मार्गदर्शक म्हणून काम करतील आणि तेथील पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि परंपरा आणि त्या परिसरातील वनस्पती आणि वनस्पती याबद्दल समजावून सांगतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.