Haryana CM Nayab Singh Saini: सामान्यांशी नाळ जोडलेला असामान्य नेता; मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची २४ तास सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:54 IST2025-02-05T09:53:24+5:302025-02-05T09:54:55+5:30
हरियाणातील विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक मुख्यमंत्री बाजारात, गावांमध्ये पोहचतात तिथे स्थानिकांशी बोलतात.

Haryana CM Nayab Singh Saini: सामान्यांशी नाळ जोडलेला असामान्य नेता; मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची २४ तास सेवा
चंदीगड - हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे जमिनीशी नाळ जोडलेले नेते आहे. ज्यांची कार्यशैली आणि लोकसेवेचा ठसा राज्याच्या राजकारणात कायम प्रेरणादायी ठरत आहे. नायब सिंह सैनी ना केवळ प्रशासकीय पातळीवर त्यांचे नेतृत्व सिद्ध करत आहेत तर सर्वसामान्य जनतेत राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत. विनम्र आणि मृदु भाषी स्वभावानं ते हरियाणातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांच्यातील नेतृत्व गुण, लोकांसाठी प्रामाणिक सेवा आणि विकास यामुळे हरियाणा सशक्त राज्य म्हणून पुढे येत आहे. धोरण, सचोटी आणि प्रामाणिकपणा यामुळे ते जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
खरा नेता तोच असतो जो कायम जनतेसोबत राहतो, त्यांच्या समस्या सोडवून तोडगा काढतो. एक सैनिक आणि शेतकरी पुत्र असल्याने हरियाणातील प्रत्येकाला त्यांच्या घरातीलच कुणी मुख्यमंत्री आहे असं वाटते. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते कायम जनतेच्या सेवेशी तत्पर असतात. मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले आहेत. जर कुणी रात्री १२ वाजताही त्यांना भेटायला जातो तेव्हाही ते कुणाला निराश करत नाहीत.
जनसेवेची जबाबदारी केवळ कार्यालय आणि बैठकांपर्यंत मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याची गरज आहे असं त्यांना वाटते. त्यामुळेच मुख्यमंत्री सैनी अनेकदा त्यांचा ताफा रोखून रस्त्यात सर्वसामान्याशी संवाद साधताना, त्यांच्या समस्या ऐकताना आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना देताना दिसून येतात. हरियाणातील विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक मुख्यमंत्री बाजारात, गावांमध्ये पोहचतात तिथे स्थानिकांशी बोलतात. मुख्यमंत्री सैनी यांच्या या कार्यप्रणालीमुळे जनतेत ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
प्रशासनावर मजबूत पकड
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सत्तेत येताच प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णायक नेतृत्व गुण दाखवले. सरकार बनल्यानंतर पहिल्याच १०० दिवसात नवीन योजनांची फक्त घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात जमिनीवर त्याची अंमलबजावणीही करून दाखवली. राज्यातील प्रशासनावर त्यांनी चांगली पकड ठेवली आहे. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे प्रशासनात कुठलाही हलगर्जीपणा आणि दिरंगाई चालणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. फक्त धोरणे आखणारे नेते नाही तर त्यांची अंमलबजावणी करणारे उत्तम प्रशासकही म्हणूनही त्यांनी नवी ओळख निर्माण केली. सैनी यांच्या कार्याने सरकारला आणखी गतिमान, प्रभावी बनवले आहे.
मृदुभाषी आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व
नायब सिंह सैनी यांचं वैशिष्ट म्हणजे त्यांची मृदुभाषी आणि मैत्रीपूर्ण स्वभाव, ते प्रत्येक माणसासोबत आत्मीयतेने आणि सन्मानाने बोलतात ज्यामुळे लोकांना ते आपल्यातीलच एक वाटतात. त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणा वाटतो, ज्यामुळे जनतेच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे. नायब सिंह सैनी यांचा स्वभाव इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा असो, सर्वसामान्यांशी संवाद असेल कायम मितभाषी असतात. त्यामुळेच हरियाणातील जनतेत ते लोकप्रिय असून त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.
हरियाणातील विकासासाठी कटिबद्धता
मुख्यमंत्री बनल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी हरियाणाच्या विकासाला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांनी अनेक योजनांची सुरुवात केली. राज्याला आत्मनिर्भर आणि समृद्ध बनवण्याकडे त्यांचा कल आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार आणि पायाभूत सुविधा यात बऱ्याच सुधारणा झाल्याचं चित्र दिसून येते. सैनी यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील सुधारणा आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे. सरकारी योजनांना भ्रष्टाचारमुक्त बनवण्यासाठी त्यांनी कठोर पाऊले उचलली ज्यातून सरकारी योजनेचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत थेट पोहचतो.
प्रेरणादायी राजकीय प्रवास
नायब सिंह सैनी यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मेहनत, निष्ठा आणि लोकसेवा यातून ते आज मुख्यमंत्रिपदावर पोहचलेत. सैनी यांचा प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे ते विविध पदावर राहूनही त्यांनी साधेपणा जपला आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि दूरदर्शीने हरियाणातील राजकारणाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. विकासाला प्राधान्य देण्यासोबतच योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी यासाठी ते कटिबद्ध आहेत. सैनी यांच्या याच विचाराने राज्याला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त बनवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली आहे.