"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 08:21 PM2024-09-28T20:21:40+5:302024-09-28T20:24:59+5:30
केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही."
हरियाणामध्ये आम आदमी पक्षाशिवाय सरकार स्थापन होणार नाही आणि ज्याचे कुणाचे सरकार येईल त्याला आम आदमी पक्षाचा पाठिंबा असेल, असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी हरियाणातील कॅथलमधील कलायत येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "मला येथेही (हरियाणा) काम करून दाखवायचे आहे. कारण ही माझी जन्मभूमी आहे. मी पाच गॅरंटी देऊन जात आहे. लोक विचारतात, गॅरंटी देत आहात, पण जिंकणार का? जर यांनी मला 3-4 महिने आधी सोडले असते, तर आम्ही हरियाणात सरकार स्थापन केले असते. मला 10 दिवसांपूर्वी सोडले. पण, मी आजही सागत आहे की, आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, एवढ्या जागा आम्हाला मिळणार आहेत. कुणाचेही सरकार आले, तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. जी गॅरंटी दिली आहे, ती पूर्ण करू."
मला कारागृहात त्रास दिला गेला - केजरीवाल
भाजपवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, "या लोकांनी मला तुरुंगात टाकले होते. पाच-सहा महिने तुरुंगात होतो. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलो आहे. आपल्याला तुरुंगात विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक प्रकारचा छळ केला. मी शुगर पेशन्ट आहे. मला रोज चार वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावी लागतात. त्यांनी माझे औषध आणि इंजेक्शनही बंद केले होती. त्यांना काय करायचे होते माहीत नाही."
केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही."