Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:27 PM2024-09-19T13:27:15+5:302024-09-19T13:28:00+5:30
Haryana Election bjp manifesto : हरियाणा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र जारी केले.
Haryana Election News : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ भाजपने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. संकल्प पत्राच्या माध्यमातून भाजपने २० मोठी आश्वासने दिली. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतकमध्ये संकल्प पत्र जारी केले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हरियाणातील २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्व महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील.
तसेच 'घर गृहिणी योजने'च्या माध्यमातून ५०० रुपयांना सिलिंडर दिला जाईल. पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार, ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटर दिल्या जातील, हरियाणाला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवणार. याशिवाय इतरही अनेक आश्वासने भाजपने दिली आहेत. दुसरीकडे काँग्रेसने हरियाणातील जनतेला सात आश्वासने दिली आहेत.
नॉन स्टॉप हरियाणा का संकल्प पत्र
— Haryana BJP (@BJP4Haryana) September 19, 2024
प्रमुख 20 संकल्प #BJPHaryanaSankalpPatrapic.twitter.com/Cci9hM96pB
संकल्प पत्राच्या माध्यमातून भाजपची आश्वासने
सर्व महिलांना लाडो लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये
शहरी आणि ग्रामीण भागात पाच लाख घरे
MSP वर घोषित झालेल्या २४ पिकांची खरेदी
प्रत्येक कुटुंबासाठी दहा लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
दोन लाख तरुणांना सरकारी नोकरी
पाच लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी आणि नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजनेतून मासिक स्टायपेंड
लहान मागास जातींसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळे
पेन्शनमध्ये वाढ करणार
दक्षिण हरियाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अरवली जंगल सफारी पार्क
देशातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या OBC आणि SC जातींच्या हरियाणातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
हरियाणा सरकार OBC श्रेणीतील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेव्यतिरिक्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी देणार
प्रत्येक जिल्ह्यात ऑलिम्पिकच्या खेळांसाठी प्रशिक्षण
#WATCH | Union Minister and BJP national president JP Nadda releases party's 'Sankalp Patra' (manifesto) for the Haryana Assembly Elections in Rohtak, Haryana.
— ANI (@ANI) September 19, 2024
CM Nayab Singh Saini, Haryana BJP president Mohan Lal Badoli are also present. pic.twitter.com/DZRiyHNH8i