हरयाणा निवडणूक 2019: खट्टर पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, सादर करणार सरकार बनवण्याचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:34 AM2019-10-25T11:34:52+5:302019-10-25T11:41:30+5:30
हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत.
चंदीगडः हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, खट्टर भाजपाच्या अध्यक्षांसमोर सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सादर करणार आहेत. तसेच दिल्लीत ते हरयाणातील अपक्ष आमदारांचीही भेट घेणार आहेत. गुरुवारी रात्रीच गोपाल कांडासह सहा अपक्ष आमदारांना चार्टर्ड प्लेन घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत.
हरयाणात बहुमतासाठी आवश्यक जागा कोणालाच न मिळाल्याने तिथे त्रिशंकू स्थिती आहे. या 90 जागा असलेल्या विधानसभेतील केवळ 40 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत. जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकल्याने त्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.
Haryana CM ML Khattar leaves for Delhi from Chandigarh; He will hold a meeting with BJP Working President JP Nadda and BJP Haryana In-charge Anil Jain today. pic.twitter.com/tzxjygJgN1
— ANI (@ANI) October 25, 2019
मात्र सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपाचे नेते व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यातील पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बराला यांचाही पराभव झाला असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याने हरयाणातील मतदारांचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आभार मानले आहेत.
Haryana CM ML Khattar: I am optimistic and we are going to form the government in #Haryana. pic.twitter.com/x44SufLTBz
— ANI (@ANI) October 25, 2019