हरियाणा निवडणूकही १५ आॅक्टोबरलाच होणार
By admin | Published: September 13, 2014 04:48 AM2014-09-13T04:48:01+5:302014-09-13T04:48:01+5:30
हरियाणा राज्याची ९० सदस्यांची नवी विधानसभा निवडण्यासाठी महाराष्ट्रासोबतच येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे
नवी दिल्ली : हरियाणा राज्याची ९० सदस्यांची नवी विधानसभा निवडण्यासाठी महाराष्ट्रासोबतच येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. तेथेही १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होईल.
सध्याच्या हरियाणा विधानसभेची मुदत २७ आॅक्टोबरला संपत असून, त्याच्या काही दिवस आधी तेथील काँग्रेसच्या भूपिंदरसिंग हुडा सरकारचे भवितव्य ठरेल. हरियाणातील मतदारांची संख्या १.६१ कोटींहून अधिक असून, १६,२४४ मतदान केंद्रांवर ते मतदान करू शकतील.
यासोबतच ओडिशातील कंधामल वोकसभा मतदारसंघात तसेच अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, गुजरात व
उत्तर प्रदेश या राज्यांत प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातही त्याच दिवशी मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)