स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 02:40 PM2020-12-05T14:40:24+5:302020-12-05T14:42:02+5:30

विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Haryana home minister anil vij found corona positive Explanation given by the company | स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण

स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण

Next
ठळक मुद्देविज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते.कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, स्वतः विज यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर चर्चेला सुरुवात होताच, कंपनीकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे.


चंदीगढ - कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

दोन डोसनंतरच लस प्रभावी, भारत बायोटेकचे स्पष्टिकरण -
लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर चर्चेला सुरुवात होताच, कंपनीकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या 2 ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस 28 दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस 14 दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, स्वतः विज यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. "मी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करून घ्यावी," असे विज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस
हरियाणामध्ये 20 नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. 20 नोव्हेंबर रोजी विज यांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत 200 जणांना कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोव्हॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जात आहे.


 

Web Title: Haryana home minister anil vij found corona positive Explanation given by the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.