मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:45 PM2020-09-05T14:45:46+5:302020-09-05T15:03:42+5:30

शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही. मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. 

Haryana minister anil vij came in kanganas support asked is mumbai shiv sena dynasty | मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही - अनिल विजमुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? अनिल विज यांचा सवाल.मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो - अनिल विज

नवी दिल्ली/मुंबई - कंगना रणौत आणि शिवसेना वाद जबरदस्त पेटला आहे. असे असतानाच, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. 

कंगनाचे समर्थन करताना विज यांनी शनिवारी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. ते म्हणाले, "मुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? का त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो. जे अशा प्रकारच्या धमक्या देतात त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण कुणालाही सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही."

नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा -
शिवसेना विरुद्ध कंगना वादावर नितेश राणेंनी अतिशय सूचक ट्विट केलं आहे. 'कंगना तर फक्त बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचं आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे. यापेक्षा जास्त काही नाही,' असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण -
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अमृता फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, ''आपण एखाद्याच्या मताशी असहमत असू शकतो. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही.''

शिवसेना विरुद्ध कंगना -
कंगना राणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले.

मी पोकळ धमक्या देत नाही - राऊत
मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?

Read in English

Web Title: Haryana minister anil vij came in kanganas support asked is mumbai shiv sena dynasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.