कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली
By मोरेश्वर येरम | Published: December 15, 2020 08:46 PM2020-12-15T20:46:02+5:302020-12-15T20:55:49+5:30
अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता.
रोहतक
कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता रोहतक येथील रुग्णालयातून हलवून गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. याआधी त्यांना अंबाला रुग्णालयातून रोहतक येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. त्यांना कोरोना लशीचा एक डोस देण्यात आला होता.
लस देऊनही कोरोनाची लागण झाल्याने भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानंतर भारत बायोटेक आणि आयसीएमआरला संयुक्तरित्या यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण
कोवॅक्सीनचे दोन डोस घेतल्यावर १४ दिवसांनंतर लस परिणामकारक ठरते असं डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, असं अनिल विज यांनीही नंतर स्पष्ट केलं होतं.