"मी कारगिल युद्ध लढलो, माझा मुलगा..."; नूंह हिंसाचारात मारल्या गेलेल्या जवानाच्या वडिलांचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:29 PM2023-08-02T12:29:18+5:302023-08-02T12:29:54+5:30

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले.

haryana nuh violence deceased homeguard neeraj father says proud that son died in the line of duty | "मी कारगिल युद्ध लढलो, माझा मुलगा..."; नूंह हिंसाचारात मारल्या गेलेल्या जवानाच्या वडिलांचं दु:ख

फोटो - आजतक

googlenewsNext

हरियाणातील मेवात-नूंह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात होमगार्ड नीरज यांना आपला जीव गमवावा लागला. नीरजचं कुटुंब गढ़ी बाजीदपूर, गुरुग्राम येथे राहतं. हे हिंदूबहुल गाव आहे, जिथे 50 मुस्लिम कुटुंबही राहतात. 'आज तक'शी केलेल्या संभाषणात नीरजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या गावातील लोक नेहमीच शांतता आणि सौहार्दाने एकत्र राहतात. अशा हिंसाचाराचा विचारही त्यांनी केला नव्हता.

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. नीरजचे वडील भावूक झाले. ते म्हणाले, "मी देशाची सेवा केली, मी कारगिलमध्ये लढलो, माझा मुलगा कर्तव्य बजावताना शहीद झाला याचा मला अभिमान आहे. नीरजवर काल पूर्ण आदराने अंत्यसंस्कार करण्यात आले."

नीरजचे वडील म्हणाले, "जे लोक जातीय तणाव निर्माण करतात ते चुकीचे आहेत, कोणताही धर्म असे म्हणत नाही. मी माझ्या नातवंडांनाही देशसेवेसाठी पाठवणार आहे." दुसरीकडे, नीरजच्या पत्नीने सांगितले की, "मी सरकारला आवाहन करते की, दोन समुदायांमधील हे भांडण थांबवा. माझ्यासारखी एखादी महिला विधवा होऊ नये किंवा कोणाच्याही मुलांनी वडील गमावू नये असं मला वाटत आहे. 

हिंसाचारात ठार झालेल्या चार नागरिकांमध्ये शक्तीचेही नाव आहे. शक्ती हा नूहपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादस गावचा रहिवासी होता. या गावात हिंदूंची लोकसंख्या फक्त दोन टक्के आहे. मात्र आजपर्यंत येथे कधीही हिंसाचार किंवा गोंधळ झाला नाही. शक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्ती हा बडकल भागातील एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. गवंडी म्हणूनही काम करायचे. बडकल भागातून हिंसाचार सुरू झाला तेव्हा शक्ती घरी आला होता. 

हिंसाचारानंतर गावातील सर्व हिंदू कुटुंबे घाबरली, मग कळले की गावातील मोठ्या गुरुकुलावर (आश्रम) दंगलखोरांनी हल्ला केला आहे. माहिती मिळताच शक्ती त्या बाजूला गेले, त्यानंतर तो घरी परतलेच नाहीत. यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यात सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. शक्तीच्या डोक्यात जड वस्तूने मागून हल्ला करण्यात आला. 300-400 च्या जमावाने गुरुकुलावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: haryana nuh violence deceased homeguard neeraj father says proud that son died in the line of duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.