महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; भाजपाच्या क्रीडा मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:45 PM2023-01-01T12:45:15+5:302023-01-01T12:45:52+5:30
भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात चंदिगड पोलिसांत महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात चंदिगड पोलिसांत महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चंदीगडच्या एसपी यांची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकाने क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती. आता मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर 26 पोलीस ठाण्यात कलम-354, 354A, 354B, 342, 506 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी लेडी कोचने चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली यानंतर तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी 26 पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना
सिंग यांच्याविरोधात ज्युनियर महिला प्रशिक्षकाने आरोप केला आहे, मंत्री संदीप सिंग यांनी महिलेला चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून विनयभंग केला असल्याच तक्रारीत म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी महिला प्रशिक्षक पंचकुलामध्ये क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून रुजू झाली होती, पण सिंग यांनी हस्तक्षेप करून बदली केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला कोचने आयएनएलडी नेते अभय चौटाला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. दस्तऐवज पडताळणीच्या बहाण्याने मंत्र्याने त्यांना चंदीगडमधील सेक्टर-7 येथील घरी बोलावले होते, असा आरोप केला आहे.
क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचे खंडन केले आहे. महिला प्रशिक्षकाची बदली झाली, त्यामुळेच ती आरोप करत असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.