हरियाणा: चोरीचा आरोप असलेल्या दलित तरूणाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: October 23, 2015 09:41 AM2015-10-23T09:41:53+5:302015-10-23T12:49:48+5:30
कबूतर चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १५ वर्षीय दलित मुलाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २३ - सुनपेड गावातील दलित हत्याकांडात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हरियाणातील गोहाना येथे आणखी एका १५ वर्षीय दलित मुलाचा संशयास्पद रितीने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. कबूतर चोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मुलाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनीपत जिल्ह्यातील गोहाना गावात गुरूवारी ही घटना घडली असून हा मुलगा त्याच्या घरी मृत्यूमुखी पडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, मात्र पोलिस कोठडीतच आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगत पोलिसांनीच आमच्या मुलाची हत्या केली, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहार समुदायातील काही लोकांनी बुधवारी या मुलावर कबूतरी चोरीचा आरोप करत त्याच्याविरोधात सोनीपत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागमी केली होती. मात्र लोहार समुदायातील लोकच आमच्या मुलाला पोलिस स्थानकात घेऊन गेले आणि पोलिस कस्टडीतच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.